[ads1]
![]()
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, १ जून ते ६ सप्टेंबरदरम्यान अपेक्षित सरासरी ३३५.४ मिमीच्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ २५५.७ मिमी म्हणजे ७६.२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात सुमारे २३.८ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी ६ सप्टेंबरपर्यंत २७१ मिमी, तर मे ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ४९१ मिमी पाऊस झाला होता. यंदा सप्टेंबरचा पहिला आठवडाही कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पावसाचे असमान चित्र पाहायला मिळत आहे. अकोले तालुक्यातील वाकी महसूल मंडळात १०५९.७ मिमी (२७१.४ टक्के), तर शेंडी मंडळात ९८७.७ मिमी (२५३ टक्के) पाऊस झाला आहे. दुसरीकडे राहुरी तालुक्यातील देवळाली आणि टाकळीमिया महसूल मंडळात केवळ ६३ मिमी पाऊस झाला आहे. पाथर्डी व जामखेड तालुक्यांतील स्थितीही चिंताजनक आहे.
[ads2]
अहिल्यानगर:पावसाची ओढ; जिल्ह्यामध्ये केवळ 255.7 मिमी पाऊस
















Leave a Reply