[ads1]
![]()
अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला आहे. शिक्षक दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. सिनकर यांची निवड शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानामुळे झाली आहे. त्यांनी विद्यार्थी-केंद्रित अध्यापन, नवीन शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केले आहेत. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण अधिक व्यावहारिक, आधुनिक आणि रोजगाराभिमुख बनवण्यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. अध्यापनासोबतच डॉ. सिनकर यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि बदलत्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजांनुसार क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक व तांत्रिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र शासनाचा हा राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ शासकीय तंत्रनिकेतनसाठी अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याला आणि गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाच्या प्रयत्नांना राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे. डॉ. सिनकर यांच्या या यशाबद्दल अमरावती तंत्रशिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. मानकर, संस्थेतील प्राचार्य डॉ. बोराडे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
[ads2]
अमरावती येथील डॉ. सिनकर यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’:शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुखाला पुणे विद्यापीठात सन्मान
















Leave a Reply