[ads1]
![]()
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासास्थानाबाहेर आंदोलन पुकारल्यामुळे चर्चेत आलेले भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आंदोलनादरम्यान मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे बॅकफूटवर जावे लागल्यानंतर, आता कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. कोल्हापुरातील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मात्र, भाषणाच्या ओघात बोलताना त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, आज कृष्णराज महाडिक यांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे… महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष! एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, विश्वास टाकला आहे… कृष्णराज महाडिक हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असताना वडिलांनी थेट युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख केला. विशेष म्हणजे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली नाही आणि धनंजय महाडिक पुढे बोलत राहिले. शिवतीर्थावरील आंदोलनावरून पक्षांतर्गत नाराजी यापूर्वी अमित ठाकरे यांच्या मुद्द्यावरून कृष्णराज महाडिक यांनी राज ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, मनसेच्या कडव्या प्रतिकारामुळे भाजप युवा मोर्चाला माघार घ्यावी लागली होती. या आंदोलनानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले होते. एखादी व्यक्ती बालबुद्धीने वागली तर त्याला किती महत्त्व द्यायचे? लोकांमधील त्यांची प्रतिमा यामुळे खराब होते. त्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त अशा गोष्टींना महत्त्व देऊ नये, ही आमची भूमिका होती.वरिष्ठ नेत्यांची नाराजी आणि पक्षांतर्गत झालेल्या टीकेमुळे कृष्णराज महाडिक यांच्या ‘उगवते युवा नेतृत्व’ या प्रतिमेला धक्का बसला होता. त्यातच आता खासदार धनंजय महाडिक यांच्या या चुकून झालेल्या उल्लेखावरून विरोधकांनी महाडिक पिता-पुत्रांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वृत्त वाचा
अजित पवारांच्या अपघातावर आता बोलणे बंद:12 वी, ‘नीट’ की ‘सीईटी’?; परीक्षांच्या फेऱ्यात मुले भरडली जात आहेत, सुप्रिया सुळेंचा केंद्र अन् राज्य सरकारला सवाल
अजित पवार यांच्या अपघाताबाबत मी आजपासून बोलणार नाही, असे स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षण व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. 12 वी, ‘नीट’ की ‘सीईटी’ परीक्षा द्यायची, अशा गोंधळात मुले नाहक भरडली जात असून सामान्य कुटुंबांना हे शिक्षण परवडणार कसे, असा सवाल त्यांनी केंद्र व राज्य सरकारला विचारला. तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि डीजेच्या नियमांवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर
[ads2]
















Leave a Reply