[ads1]
![]()
पुणे रोडवरील फेम सिनेमाजवळील शिवाजीनगर भागातील पॉल ढाब्यासमोर उपनगरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला नाशिकरोडकडून तपोवन रोडकडे वळणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. मध्यरात्री सुमारे 2 वाजता झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार पीयूष विलास मोरे (21, रा. सत्यम पार्क, जाचक नगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सैन्यदलातील मित्र अनुराग दुबे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह पसार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष हा 3 मित्रांसोबत सिटी सेंटर मॉल येथे सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. अनुराग दुबे हा सैन्यदलात कार्यरत असून, सुट्टीसाठी नाशिकरोड येथे आला होता. चित्रपट संपल्यानंतर पीयूष दुचाकीवरून अनुरागला मागे बसवून घरी परतत होता. अन्य 2 मित्र दुसऱ्या दुचाकीवरून त्यांच्या मागोमाग येत होते. पॉल ढाब्यासमोरून दुचाकी उपनगरच्या दिशेने जात असताना नाशिकरोडकडून आलेल्या पिकअपने तपोवन रोडकडे जाण्यासाठी अचानक वळण घेतले. त्यावेळी दुचाकीची पिकअपला जोरदार धडक झाली. दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच भाजप नगरसेवक सतीश निकम यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पीयूषला त्याचे चुलते राज पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉ. शिंदे यांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अनुरागला पुढील उपचारांसाठी पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. पीयूष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि 2 भाऊ आहेत. त्याचे वडील जळगाव येथे आयटीआयमध्ये कार्यरत आहेत. पीयूषवर सायंकाळी देवळाली गाव येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात नोंद असून, पोलिस हवालदार संदीप हिवाळे तपास करीत आहेत. हेही वाचा.. आंतरवाली सराटीत ओबीसींचेही आंदोलन:आरक्षणाच्या मुद्द्यावर मंगेश ससाणे आक्रमक, ‘जीव गेला तरी चालेल’ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या आंतरवाली सराटी येथे आता ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठीही आंदोलन सुरू झाले आहे. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी रविवारी दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटी येथील सोनिया नगर परिसरात लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. ओबीसींचे हक्क आणि आरक्षणाचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे ससाणे यांनी सांगितले.सविस्तर वाचा..
[ads2]
नाशिकमध्ये सिनेमा पाहून घरी परतताना काळाचा घाला:पिकअपच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर
















Leave a Reply