[ads1]
![]()
मोहोळ शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन यांच्या कंपाऊंडमधील जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले ३० बाय ३० आकाराचे पत्राशेड तातडीने हटवण्यात आले. तसेच शाळेच्या जागेत बेकायदा प्रवेश करून अतिक्रमण केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,दि.२९ ऑगस्टच्या रात्री शाळेचे गेट बंद करून गेल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी कंपाऊंडच्या पश्चिम बाजूस पूर्वपरवानगी न घेता पत्राशेड उभारले. यामुळे शाळेच्या जागेचा अनधिकृत वापर होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. चौकशीत अतुल क्षीरसागर व इतरांनी सदर शेड उभारल्याची माहिती मिळाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटील करत आहेत. गुन्हा दाखल करण्यासाह अनधिकृत उभारलेले पत्र्याचे शेड काढण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार सचिन मुळीक यांना मंगळवारी दिले होते. त्यानंतर काही तासांतच गुन्हा दाखल करून सदर पत्राशेड हटवण्यात आले.
[ads2]
शाळेच्या जागेतील पत्राशेड हटवले:मोहोळमध्ये जि. प. च्या शाळा एक व दोनच्या कंपाउंडमधील शेड काढले
















Leave a Reply