पुण्यातून अपहरण करून उत्तर प्रदेशला नेत होते:समृद्धी महामार्गावर पोलिसांचा 3 किमी पाठलाग, तरुणीसह 6 जण ताब्यात

[ads1]


पुण्यातील चिखली परिसरातून 24 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला कारमधून उत्तर प्रदेशच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे समृद्धी महामार्गावरील पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संशयित कार दिसताच महामार्ग पोलिसांनी तब्बल तीन किलोमीटर पाठलाग करून कार अडवली. या कारवाईत अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली असून एका तरुणीसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय? पुण्यातील चिखली परिसरातून आरशद शकील अहमद सिद्दीकी (24) या तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. अपहरणकर्ते अर्टिगा कारमधून तरुणाला घेऊन समृद्धी महामार्गाने उत्तर प्रदेशच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील संबंधित यंत्रणांना सतर्क केले. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी संशयित कारचा शोध सुरू केला. बाभळेश्वर विभागाचे महामार्ग पोलीस समृद्धी महामार्गावर गस्त घालत असताना चॅनल क्रमांक 523 जवळ त्यांना संशयित अर्टिगा कार दिसली. कार भरधाव वेगाने जात असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तत्काळ कारचा पाठलाग सुरू केला. कार थांबवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू ठेवले.अखेर तीन किलोमीटर पाठलाग केल्यानंतर चॅनल क्रमांक 520 जवळ पोलिसांनी कारला घेरून थांबवले. कारमध्ये एका तरुणीसह सहा संशयित कार थांबवल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता अपहरण झालेला तरुण कारमध्ये आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी नेले. कारमध्ये असलेल्या एका तरुणीसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे महमद अन्वर सिद्दीकी (39), निजामुद्दीन सिद्दीकी (41), फाजील हुसेन सिद्दीकी (23), महंमद साहील सिद्दीकी (21), महंमद सिद्दीकी इमामुद्दीन सिद्दीकी आणि सायमा खातून सिद्दीकी (26) अशी आहेत. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना कसं पकडलं? या संपूर्ण कारवाईत पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अलर्ट आणि महामार्ग पोलिसांची तत्परता महत्त्वाची ठरली. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर संशयित कार कोणत्या मार्गाने जात आहे, याची माहिती महामार्ग पोलिसांना देण्यात आली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना कार दिसताच त्यांनी तिचा पाठलाग केला. कार थांबवण्याच्या प्रयत्नात सुमारे तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाला. अखेर कारला घेरून थांबवण्यात आले आणि त्यातील सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पुणे पोलिसांकडे कारवाईनंतर अपहरण झालेला तरुण, सहा संशयित आणि अर्टिगा कार कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पथक आरोपींचा ताबा घेण्यासाठी रवाना झाले आहे. तरुणाचे अपहरण नेमके कोणत्या कारणातून करण्यात आले, आरोपींचा त्याच्याशी काय संबंध आहे आणि त्याला उत्तर प्रदेशात का नेले जात होते, याचा तपास आता पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत. ही कारवाई बाभळेश्वर महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विक्रान्त कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ठोंबरे, पोलीस नाईक महेश बोरुडे, रामचंद्र साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पालवे, रोहित आरवडे आणि शिंदे यांच्या पथकाने केली. हेही वाचा.. विद्यानंद बापटांवर हल्ला अयोग्य, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार:मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका; दिशा सालियन प्रकरणावरही दिली प्रतिक्रिया पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेली मारहाण अत्यंत अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक केली असल्याचे त्यांनी सांगितले. विधानभवनात आयोजित पत्रकारांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बापट प्रकरणासह संतोष पंडित यांची अटक आणि दिशा सालियन प्रकरणाच्या सीबीआय तपासावर भाष्य केले.सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *