ग्रामीणमध्ये अघोषित भारनियमन; शेतकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा:काम करा, अन्यथा बदली करून घ्या; आमदार देशमुखांचा अधिकाऱ्यांना इशारा‎

[ads1]


ग्रामीणमध्ये अघोषित विद्युत भारनियमन सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आढावा बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. आधीच पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकरी चिंतातूर असतानाच िवद्युत पुरवठ्याच्या समस्येमुळे ते मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आ. नितीन देशमुख यांनी बाळापूर मतदारसंघातील समस्यांबाबत महावितरण कंपनीच्या अभियंते, अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या, कामे न करणाऱ्या अभियंता, अधिकाऱ्यांनी माझ्या मतदारसंघातून आपली अन्यत्र बदली करून घ्यावी, असा शब्दात आ. देशमुख यांनी इशारा दिला गत चार वर्षांपासून अकोला विशेषत: जुने शहरासह अन्य भाग तसेच ग्रामीण भागातही विजेचा खेळखंडोबा असतो. क्षणाक्षणाला वीजपुरवठा बंद होणे; एखादे नगर अंधारात बुडणे, हे आता नेहमीच झालेले आहे. सातत्याने तीन वर्ष पाठपुरावा केल्यानंतरही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीला अकोलेकरांना सुरळीत आणि पूर्णवेळ वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यश आलेले नाही. नियमित विद्युत देयक भरणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीला महावितरण कंपनीचे काही अभियंते वटाण्याच्या अक्षता लावत असल्याचा अनुभव अनेकांना नेहमीच येतो. दऱम्यान आता ग्रामीण भागातील अघोषित भारनियमन, उघडी रोहित्रे, लोमकळणाऱ्या वीजतारा आणि प्रलंबित तक्रारींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागात तर विद्युत पुरवठ्याची समस्या वाढतच असून, शिवसेनेकडून आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त झालेल्या देशमुखांनी, शेतकऱ्यांची कामे होत नसतील तर माझ्या मतदारसंघातून बदली करून घ्या, असे म्हणत अभियंते, अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. . या बैठकीला महावितरणचे ग्रामीण कार्यकारी अभियंता प्रविण चांभारे, उपअभियंता अनिल शेगोकार (बाळापूर), उपअभियंता आशिष रंगारी (पातूर) यांच्यासह महावितरणचे कनिष्ठ अभियंत्यांस हशिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर पाटील म्हैसने, बबलू देशमुख, शहरप्रमुख आशिष गावंडे, साकलेन खान पठाण उपस्थित होते. वीजेच्या समस्येमुळे सिंचन व्यवस्था प्रभावित : शासनाकडून अधिकृत भारनियमनाचे कोणतेही निर्देश नसताना महावितरणकडून बाळापूर व पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात अघोषित भारनियमन केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी बैठकीत केला. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतीची कामे आणि सिंचन व्यवस्था प्रभावित होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आधीच पाऊस नसल्याने पीक जगवतांना प्रचंड कसरत करावी लागत असून, अशातच िवद्युत पुरवठा खंडीत होत असल्याचे शेतकरी म्हणाले. शेतातील अनेक रोहित्रांची अवस्था अत्यंत धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी रोहित्र उघडे असून, विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक फ्यूज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून वीज सुरू करावी लागत असल्याची गंभीर बाब उजेडात आली. बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. मात्र, तक्रारींचे निराकरण का झाले नाही, असा सवाल आमदार देशमुख यांनी संबंधित अभियंते-अधिकाऱ्यांना केला. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आ. देशमुखांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. अहवालानंतर कार्यवाही विद्युत पुरवठ्याच्या समस्यांबाबत अहवाल तयार होणार आहे. खंडित विद्युत तारा आणि जीवघेण्या रोहित्रांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नियुक्त कंत्राटदारांनी मागील सहा महिन्यांत केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करावा, असे निर्देश आमदार देशमुख यांनी दिले. या अहवालाच्या आधारे कंत्राटदारांच्या कामाचा आणि त्यांना अदा करण्यात आलेल्या देयकांचा आढावा घेतला जाणार आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *