कर्जतजवळ कोयना एक्स्प्रेसमध्ये धुराचे लोट:प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी रुळांवर उडी! सुदैवाने जीवितहानी नाही; VIDEO व्हायरल

[ads1]


मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी सायंकाळी कोयना एक्स्प्रेसच्या डब्यातून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी डब्यातून थेट रेल्वे रुळांवर उड्या मारून पळापळ केली. या घटनेचा आणि प्रवाशांच्या उडालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. अचानक धूर निघू लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली असली तरी, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक आणि काही लोकल फेऱ्या काही काळासाठी विस्कळीत झाल्या होत्या. या संपूर्ण प्रकाराबाबत मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून समाजमाध्यमांवर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मुख्य मार्गावर मेगाब्लॉक दरम्यान, मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर रविवार, 30 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मुख्य मार्गावरील विद्याविहार ते ठाणे दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ब्लॉक कालावधीत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत. ट्रान्सहार्बर मार्गावरही लोकल सेवा बंद मुख्य मार्गासोबतच ट्रान्सहार्बर मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ठाणे ते वाशी आणि नेरूळ अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावर एकही लोकल ट्रेन धावणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *