CET परीक्षेत शिवरायांचा एकेरी उल्लेख:शिवाजीच्या मंत्रिमंडळाचे नाव काय होते? असा केला प्रश्न; भाजप आमदाराचे थेट CET आयुक्तांना पत्र

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-05t11_1775368686.png




राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे गत 2 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या एलएलबी 3 इअर सीईटी ऑनलाईन परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. भाजप आमदार राहुल कुल यांनी या प्रकरणी थेट सीईटी सेलच्या आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्षाने गत 2 एप्रिल रोजी LLB 3 Year सीईटी ही ऑनलाईन परीक्षा घेतली. या परीक्षेच्या सामान्य ज्ञान विभागात शिवाजीच्या मंत्रिमंडळाचे नाव काय होते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या थोर महापुरुषांचा उल्लेख एकेरी शब्दांत होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमी व विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी या प्रकरणी आमदार राहुल कुल यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार, राहुल कुल यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई येथील आयुक्तांना पत्र लिहून प्रश्नपत्रिका तयार करणारी समिती व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल कुल काय म्हणाले आपल्या पत्रात? राहुल कुल आपल्या पत्रात म्हणाले, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या LLB-3 Year CET परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान विभागांतर्गत ‘शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करताना अत्यंत अनादरपूर्वक ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. ज्या राजांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली आणि ज्यांच्या आदर्शावर आजचे प्रशासन चालते, अशा थोर महापुरुषाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत इतक्या बेजबाबदारपणे होणे ही खेदाची बाब आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सदर प्रश्नपत्रिका संकलित करणाऱ्या समितीवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. CET सेलने या गंभीर चुकीबद्दल सार्वजनिकरीत्या माफीनामा प्रसिद्ध करावा. भविष्यात कोणत्याही शासकीय परीक्षेत महापुरुषांचा अवमान होणार नाही, याची नियमावली तयार करावी. इथून पुढे सर्व शैक्षणिक साहित्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असाच उल्लेख अनिवार्य करावा. तरी आपण या विषयाचे गांभीर्य ओळखून, LLB-3 Year CET परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संबंधित दोर्षीवर कारवाई करण्याबाबत आपणाकडून संबधितांना आदेश व्हावेत, अशी मागणी राहुल कुल यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio Docy - Documentation & Knowledge base WordPress Theme with Helpdesk Forum Dogma – Responsive Architecture WordPress Theme DOIT – Creative MultiPurpose Theme Dokan Integrate & Design Launcher Addon for LUMISE Product Designer Dokan Postcode Restriction Dokan Pro WordPress Plugin Dokan Vendor Total Sales Dokan – WooCommerce Booking Integration DOKANS – Multitenancy Based Ecommerce Platform (SAAS) Dolan – Personal Portfolio Elementor Template Kit
Enable Notifications OK No thanks