जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनादरम्यान गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. या पथसंचलन मार्गावर काही जणांकडून दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे गावात अचानक तणावाचे वातावरण निर्माण होऊन काही काळ मोठी धावपळ आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, किनगावमध्ये दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे पथसंचलन नियोजित मार्गावरून जात असतानाच एका गटाने त्याला विरोध दर्शवला. याच संघर्षातून दगडफेकीचा प्रयत्न झाला आणि रस्त्यावर अचानक मोठी गर्दी जमून तणाव वाढला. पोलिसांची तत्पर कारवाई घटनेचे गांभीर्य आणि माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, नागरिकांना शांतता राखण्याच्या सूचना देऊन गावात अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, यासाठी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील खोट्या आणि अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या पथसंचलनावेळी नेमका वाद कशामुळे उफाळून आला, याचा अधिकृत तपास पोलिसांकडून सुरू आहे. हेही वृत्त वाचा.. पोलिस आयुक्तांचा मान राखत अदानींवरील डॉक्युमेंट्री डिलीट करतोय:डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय, तरी गप्प का?, राज ठाकरेंचा खासदार-आमदारांना सवाल राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या व्हिडिओला अवघ्या काही वेळात 48लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. मात्र, मुंबई पोलिस आयुक्तांनी केलेल्या विनंतीचा मान राखत ही पोस्ट डिलीट करत असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. माझा विरोध कोणत्याही व्यक्तीला नसून देशात निर्माण होत असलेल्या एकाधिकारशाहीला आहे, असा पुनरुच्चार त्यांनी या पोस्टद्वारे केला आहे. वाचा सविस्तर

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search