महामानव, संत, साधूंना जन्म देणारी महिला नेहमीच महान:चर्मकार महासंघाच्या मेळाव्यात नलिनी सौन्दणकर यांचे मत
![]()
सर्व महामानव, संत, साधू यांना महिलेनेच जन्म दिला आहे. त्यामुळे त्या सत्कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या माता झाल्या आहेत. त्या प्रसंगी दुर्गा सुद्धा झाल्या आहेत. त्यामुळे महिला नेहमीच महान आहेत, असे मत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा नलिनी सौन्दणकर यांनी महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. महिला सक्षमीकरण, सामाजिक जागरूकता आणि संघटन बळकटीकरण या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने प्रमिलाताई ओक हॉल येथे महिला मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रीय प्रवक्ता रविंद्र राजुस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मीना भागवत,ॲड. सागर श्रीकांत चौथे, महाराष्ट्र निरीक्षक गजानन भटकर, मंगल चंदन,अकोला जिल्हा अध्यक्ष प्रवीण चोपडे, रामाभाऊ उंबरकर, बुलडाणा येथील ज्ञानदेव इंगळे यांची उपस्थिती होती. तसेच अकोला जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संज्योती मांगे, शहराध्यक्ष छाया इंगळे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून लिना चिम (प्रदेश उपाध्यक्ष) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता पांडुरंग वाडेकर होते. यावेळी देशात नीट परीक्षेत ४५ वे स्थान मिळवणाऱ्या मानस शेगोकार, आधीपरिचारिका सीमा गव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात झटपट प्रश्नोत्तरे, सांस्कृतिक सादरीकरणे, विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे वातावरण उत्साही झाले. नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक ॲड. सागर चौथे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात महिलांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना कांबळे, मधुमती लोखंडे, वनिता गवई, प्रमिला वानेडकर, छाया पटके ,वर्षा चिमकर, मंदा रेवस्कर, संगीता ठोसरे, गीता डामरे, संगीता थोटे, शांताबाई वाडेकर अनिता पद्मने, दुर्गा तायडे, निवेदिता बेलुलकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भटकर यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. निवेदिता बेलूरकर यांनी केले. आभार छाया इंगळे यांनी मानले. महिलांना सन्मान मिळायला हवा समाजाची प्रगती शोधायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली? यावर अवलंबून असते, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते. त्यांच्या आवाहनानुसार आजही महिलांना दुय्यम वागणूक मिळते आहे. त्यामुळे महिलांना सन्मान मिळणे आवश्यक आहे, असे मत मीना भागवत यांनी व्यक्त केले. कुटुंबाला सुरक्षित करा : अॅड. चौथे अकोला शहरासह राज्यातील अल्पवयीन मुली आत्महत्याचा मार्ग शोधत आहे. मुलींना सुरक्षित करण्यासाठी तिला दुर्लक्षित करू नका. तिला विश्वासात घेऊन तिच्या सोबत नाळ जोडून ठेवा. तिचा आवाज बना. तरच घर, घरातील महिला आणि समाज सुरक्षित करता येईल, असे मत मनसोपाचार तज्ञ अॅड. सागर चौथे यांनी उपस्थित महिलांसोबत संवाद साधताना व्यक्त केले.
