"ओवी उलगडताना’चे उत्तम सादरीकरण:विदर्भ साहित्य संघ, साने गुरुजी वाचनालय, ‘अक्षरा वाचन संस्कार’कार्यक्रम
![]()
‘ओवी उलगडताना’ या कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण जैन लॉन्स, जठारपेठ रोड, येथे करण्यात आले होते. लोकपरंपरेला व संस्कृतीला जपणाऱ्या कार्यक्रमात ओवी या प्रकाराच्या जन्मकथेपासून, ओव्यांचा इतिहास, पौराणिक ओव्या, धनगरी ओव्या, झिम्माडा ओव्या, शेती-मातीच्या ओव्या, धाला ओव्या, लग्नाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या ओव्या, डाक ओव्या आदीचा समावेश होता. लोकसाहित्याच्या अभ्यासक व विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोल्याच्या तत्कालीन कार्याध्यक्षा स्व. सीमाताई शेटे-रोठे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला, साने गुरुजी वाचनालय, ‘अक्षरा वाचन संस्कार-२ या अभ्यासक व कलावंत महिला समूहातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. सीमाताई शेटे-रोठे यांच्या फोटोला माल्यार्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ओव्यांचे गायन डॉ. वंदना मोरे व जयश्री पुणतांबेकर यांनी केले. या वेळी हार्मोनिअमवर रवी कसबेकर यांनी साथ दिली. या वेळी व्यासपीठावर प्रत्यक्ष जातं आणि मुसळ-बत्ता यांचं दिग्दर्शनही उपस्थिताना सुखावून गेले. साने गुरुजी वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती धबाले यांना चांगल्या व्यवस्थापनाबद्दल पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.‘ओवी उलगडताना’ या कार्यक्रमाची संकल्पना व संकलन कल्पना कोलारकर यांची होती तर कार्यक्रमाचे निवेदन डॉ. साधना कुळकर्णी यांनी केले. प्रास्तविक डॉ. गजानन नारे, संचालन विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे कार्याध्यक्ष डॉ. विनय दांदळे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव प्रा.डॉ. सुहास उगले यांनी केले. ओवीचा प्रत्येक प्रकार व त्याची अभ्यासपूर्ण माहिती सादरीकरण यामध्ये मेधा देशपांडे, विद्या ठाकरे, आकांक्षा देशमुख, श्वेता चिमोटे, भाग्यश्री अभ्यंकर, जयश्री कदमने यांनी केले. ‘ओवी उलगडताना’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करणाऱ्या सर्व कलावंतांना स्व. सीमा शेटे-रोठे यांचे ‘गाव कारगीर’ या पुस्तकाची भेट वि.सा.संघ, शाखा अकोलाचे अध्यक्ष विजय कौसल, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. गजानन नारे, प्रा.डॉ. सहदेव रोठे, उपाध्यक्ष सुरेश पाचकवडे यांनी सत्कार केला.
