मंत्री छगन भुजबळ यांनी ५०० कोटींच्या कथित व्यवहारावर भाष्य करताना स्पष्ट केले की, ५०० कोटी या चावडीवरच्या गप्पा आहेत. त्या कुणी रेकॉर्ड करतात, कोण कोणाला कशाला ५०० कोटी देईल? द्यायचे असतील तर भाजप स्वतःहून नेऊन देईल, त्यांचे मंत्री संपर्कात आहेतच ना. कोणीही कोणाला ५०० कोटी दिले नाहीत आणि कोणी ते घेतलेही नाहीत, या फक्त पारावरच्या गप्पा असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, आपापसातील कलगीतुरे थांबवण्याची आवश्यकता आहे, कारण लोकांना यात काही इंटरेस्ट नाही. कोणीही कोणाला संपवू शकत नाही, प्रत्येक जण आपापल्या ताकदीनुसार आणि शक्तीनुसार राजकारणात काम करतो. अगदी ज्याचे शून्य आमदार आहेत त्याचाही पक्ष चालतो. छगन भुजबळ म्हणाले, दुष्काळावर सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे. आपापसातील कलगितुरे थांबवण्याची आवश्यकता आहे. लोकांना यात काही इंट्रेस्ट नाही. कोणीही कोणाला संपवू शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या ताकदीनुसार शक्तीनुसार राजकारणात काम करतो. ज्याचे शून्य आमदार आहेत त्याचाही पक्ष चालतो. सर्व सोडून सगळ्यांनी शेतकरी, शहरी जे नागरिक आहेत त्यांच्या प्रश्नाकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, करोडो शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम हे खूप मोठे आहे. घाई घाई केलेल्या कामामुळे सरकारने काही अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. सध्या अधिकारी बारकाईने तपासणी करत आहेत. मात्र तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत सरकारने पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सर्व अभ्यास झाल्यानंतर किती पैसे लागणार आहेत. किती पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आहे तो निर्णय सरकार घेईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे छगन भुजबळांकडून कौतुक छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे की, मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलिस अतिशय कार्यक्षम आहेत. टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर अवघ्या पंधरा तासांत इतर राज्यांतील पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आले आहे, त्याबद्दल त्यांचे नक्कीच कौतुक करायला हवे. मी स्वतः राज्याचा गृहमंत्री होतो, त्यामुळे मला याची पूर्ण कल्पना आहे. पोलिस दल अत्यंत कार्यक्षम असून, ते या प्रकरणाचा नक्कीच योग्य निपटारा करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 46 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation 'रामदास कदम, हा फालतू धंदा बंद करा':प्रसाद लाड यांचा जोरदार पलटवार; म्हणाले- आवाज वाढवून बोललात म्हणजे आम्ही घाबरणार नाही जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने पुणे महापालिकेला भेट दिली:पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर चर्चा झाली