पुणे शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, मलनिस्सारण आणि पावसाळी पाण्याचा निचरा या महत्त्वपूर्ण नागरी सेवांच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँक समूहाने सहकार्याच्या विविध शक्यतांचा आढावा घेतला. जागतिक बँक समूहाच्या वरिष्ठ शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. २३) पुणे महापालिकेला भेट देऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिका्नयिांशी चर्चा केली. या बैठकीत संभाव्य वित्तपुरवठा, तांत्रिक सहकार्य, संस्थात्मक क्षमता बळकटीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अवलंब यावर भर देण्यात आला. जागतिक बँक समूहाच्या जल क्षेत्राच्या रिजन प्रॅक्टिस डायरेक्टर मारा वॉर्विक यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पुणे महानगरपालिकेत दाखल झाले होते. पुणे शहराचा विस्तार आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील वाढत्या नागरी गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक पद्धतीने विकासकामे करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, सहआयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे आणि मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, जागतिक बँक समूहाच्या शिष्टमंडळात आंतरराष्ट्रीय पुनर्वाधणी व विकास बँकेच्या जल क्षेत्राच्या रिजन प्रॅक्टिस डायरेक्टर मारा वॉर्विक, प्रॅक्टिस डायरेक्टर विल्यम रेक्म, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे भारत, भूतान व मालदीव पायाभूत सुविधा व्यवस्थापक नुरु लामा, वरिष्ठ जलतज्ज्ञ तथा पथकप्रमुख हर्ष गोयल यांचा समावेश होता. पुणे महापालिका क्षेत्रासह समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि पावसाळी पाणी निचरा यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे शिष्टमंडळाने कौतुक केले. नागरिकांना अधिक दजेर्दार, विश्वासार्ह आणि शाश्वत नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक नियोजनाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation 500 कोटींचा व्यवहार या फक्त चावडीवरच्या गप्पा:आपापसातील कलगीतुरे थांबवून शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे- छगन भुजबळ परीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध:दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 2,40,365 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा