छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील सर्व 36 मतदान केंद्रावर शुक्रवारी ता. 23 दुपारी चारवाजेपर्यंत 61.58 टक्के मतदान झाले. यामध्ये 6352 मतदारांनी मतदान केले असून 5358 पुरुष तर 994 महिला मतदारांनी मतदान केले. या सर्व मतदान केंद्रावर वेबकास्टींगद्वारे प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले. मतदान शांततेत पार पडले. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघासाठी हिंगोली जिल्ह्यातून 10 हजार 315 मतदारांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8337 पुरुष तर 1978 महिला मतदारांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधून 36 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. आज सकाळपासूनच मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार समर्थकांनी गर्दी केली होती. मतदारांना मतदानाची माहिती व्हावी तसेच त्यांचा यादीतील क्रमांक शोधून देण्यासाठी उमेदवार समर्थकांनी मतदान केंद्राच्या बाहेर शामीयाने टाकले होते. मतदार आल्यानंतर त्यांना तातडीने यादीतील क्रमांक व नांव शोधून मतदानासाठी पाठविले जात होते. दरम्यान, जिल्हयातील 36 मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजेपर्यंत 6.63 टक्के मतदान झाले होते. सकाळच्या दुसऱ्या टप्यात मतदानाचा वेग काहीसा वाढला होता. दुपारी बारावाजेपर्यंत जिल्हयातील मतदान केंद्रावर 2051 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 19.88 टक्के एवढी आहे. होती. त्यानंतर मात्र मतदारांचा ओघ वाढला दुपारी दोन वाजेपर्यंत 37.94 टक्के मतदारांनी मतदान केले. दुपारी चारवाजेपर्यंत 61.94 टक्के मतदारांनी मतदान केले. दरम्यान, जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्राचे वेबकास्टींग करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर यांनी वेबकास्टींगद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी केली. सर्व मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 7 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation महावितरण नाट्यस्पर्धेत नागपूरच्या ‘थलाई कुथल’ला प्रथम क्रमांक:कोल्हापूरच्या ‘समोरच्या घरात’ नाटकाला दुसरा नंबर; कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना दाद 'रामदास कदम, हा फालतू धंदा बंद करा':प्रसाद लाड यांचा जोरदार पलटवार; म्हणाले- आवाज वाढवून बोललात म्हणजे आम्ही घाबरणार नाही