देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार व देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मौजे तमलूर शिवारात चालणाऱ्या अवैध तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ८ आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याकडून मोटारसायकली, मोबाईल व रोख रकमेसह एकूण ₹१,८६,०५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा सविस्तर तपशील: २१ ऑक्टोबर २०२६ रोजी देगलूर पोलिसांना बातमीदारामार्फत गुप्त माहिती मिळाली की, मौजे तमलूर येथील नवी आबादी परिसरातील सचिन नामावार यांच्या शेतातील टीनपत्र्याच्या शेडसमोरील मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीरपणे तिरट नावाचा जुगार खेळत आहेत. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन पंचांसमक्ष छापा टाकला आणि जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपी – सर्व राहणार तमलूर: १) गणेश हनमंत नामावार – वय ३३ वर्षे२) अरुण नागनाथराव मुंडकर – वय २९ वर्षे३) अर्जुन सुरेश तोटावार – वय २२ वर्षे४) हर्ष सुरेश तोटावार – वय २४ वर्षे५) किरण मोहन माचीनवार६) विठ्ठल बैलकर७) शेख जहागीर८) सचिन हनमंत नामावार जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: वाहने: ०३ मोटारसायकल – क्रमांक MH-26-S-5317, MH-08-AK-2271, MH-26-AM-8975 – अंदाजे किंमत ₹१,१७,०००/- मोबाईल हँडसेट: ०७ मोबाईल – अंदाजे किंमत ₹६४,०००/- रोख रक्कम: ₹५,०५०/- इतर साहित्य: जुगाराचे साहित्य एकूण जप्त रक्कम: ₹१,८६,०५०/- गुन्हा दाखल व पोलीस पथक: याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५१४/२०२६, कलम १२ अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व देगलूर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या नेतृत्वाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ, महिला पोलीस उपनिरीक्षक किरण बेंबडे पोलीस अंमलदार बेग, पंडित, बळदेव आणि होमगार्ड कोरेवार सर्व नेमणूक देगलूर पोलीस ठाणे यांनी पार पाडली. पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन: नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या परिसरात चालणाऱ्या अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे. Post Views: 153 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 8 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation नांदेड विभागातील ७१ रेल्वे स्थानकांवर रेल जनसंवाद आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन बीकानेर हाऊसच्या सेन्सॉरशिपवर रेहान वाड्रांचा जोरदार हल्लाबोल – VastavNEWSLive.com