“महाराष्ट्रात आणि मुंबई-पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. देशाच्या गृह खात्याच्या अधिकृत अहवालानुसार वाढत्या गुन्ह्यांमध्ये पुणे शहर देशात 5व्या क्रमांकावर पोहोचले आहे. मुंबईत सेलिब्रेटींच्या घरांची रेकी होते, घरात बुलेटप्रूफ काचा बसवण्याची नाम . मुंबईत घेतलेल्या सविस्तर पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, दुष्काळग्रस्तांना जाहीर केलेली 5,000 रुपयांची तोकडी मदत, बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान पीडीसीसी (PDCC) बँकेचा झालेला कथित गैरवापर आणि सेलिब्रिटीजच्या सुरक्षेवरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तुरुंगातला माणूस गोळीबाराची जबाबदारी घेतो, पोलीस यंत्रणा काय करतेय? अभिनेता टायगर श्रॉफ आणि सलमान खान यांच्या घराबाहेरील घटनांचा संदर्भ देत खासदार सुळे म्हणाल्या, “टीव्ही चॅनेल्सवर एका बाजूला अभिनेते आणि दुसऱ्या बाजूला हल्लेखोर दाखवले जात आहेत. अक्षय कुमार यांच्या घराच्या काचा बदलून तिथे बुलेटप्रूफ काचा बसवाव्या लागत असल्याच्या बातम्या येत आहेत. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात नागरिकांना स्वतःच्या घरात सुरक्षित वाटत नसेल, तर हे अत्यंत चिंताजनक आहे.” सॉफ्ट डिप्लोमसीचे नुकसान “अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान किंवा अक्षय कुमार हे केवळ अभिनेते नसून भारताचे आंतरराष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. ते परदेशात भारताची ‘सॉफ्ट डिप्लोमसी’ आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचे काम करतात. अशा राष्ट्रीय आयकॉन्सची सुरक्षा करण्यात हे ‘डबल इंजिन’ सरकार अपयशी ठरत आहे. तुरुंगात बसलेली व्यक्ती गोळीबाराची कबुली देते आणि पोलीस काहीच करू शकत नाहीत, यावर संसदेच्या आगामी अधिवेशनात आम्ही जाब विचारणार आहोत.” 5,000 देऊन बोळवण नको; हेक्टरी 1 लाख भरपाई द्या! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या शासकीय मदतीवर बोलताना त्यांनी आकडेवारी मांडली. “पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळायला हवेत. राज्य सरकारने शेवटचा हप्ता 13 मार्च रोजी दिला होता; त्यानंतर नवीन आर्थिक वर्षातील 4,000 रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे थकीत 4,000 आणि आताचे 5,000 असे एकूण 9,000 रुपये शेतकऱ्यांना देणे सरकारचे कर्तव्यच आहे.” हेक्टरी 1 लाख रुपयांची मागणी “आदरणीय शरद पवार साहेबांनी सरकारला पत्र लिहून केवळ सूचना केल्या आहेत, कारण आम्हाला दुष्काळाचे राजकारण करायचे नाही. मात्र, पिकांची झालेली नासाडी पाहता शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची थेट मदत दिली पाहिजे. बँकांची सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवली पाहिजे आणि रोजगार हमी योजनेची (नरेगा) कामे युद्धपातळीवर सुरू झाली पाहिजेत.” निवडणूक आयोगाकडे दाद मागणार सहकारी बँकांच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीतील गैरप्रकारांवर त्यांनी थेट बोट ठेवले. “बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी पीडीसीसी बँक २४ तास उघडी ठेवण्यात आली होती. भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे यांनी कॅश पकडून दिली होती. यंत्रणांचा असा गैरवापर करून ‘कॉपी करून पास होणे’ हे लोकशाहीला घातक आहे. याविरोधात आम्ही कायदेशीर मार्गाने सहकार विभाग आणि निवडणूक आयोगाकडे रीतसर दाद मागणार आहोत.” दत्ता भरणेंच्या बैठकीवर प्रतिक्रिया “दत्ता भरणे मामा हे 10 वर्षांपेक्षा जास्त काळ त्या बँकेचे संचालक आहेत. ते बँकेत नेहमीच जातात, त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रचारासाठी बैठक घेतली की नाही, याची मला अधिकृत माहिती नाही.” प्रदीप पुर्णेकर हत्या आणि डी. बी. पाटील विमानतळ नामांतराचा प्रश्न पत्रकार परिषदेत बाळ्या मामांच्या सुपुत्रांच्या उपस्थितीचा संदर्भ देत त्यांनी दोन स्थानिक मुद्दे उपस्थित केले. “कैलासवासी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा तपास ज्या गतीने व्हायला हवा होता, त्या गतीने होत नसल्याने त्यांच्या कुटुंबात तीव्र अस्वस्थता आहे. या प्रकरणात काही सत्ताधाऱ्यांची नावे येण्याची शक्यता असल्याने तपासावर दबाव आणला जात आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.” नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव द्या “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्रातून गेलेला आहे; मात्र केंद्र सरकारकडून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. यासाठी बाळ्या मामांच्या कुटुंबीयांनी लढा दिला असून त्याचा पाठपुरावा आम्ही दिल्लीत करणार आहोत.” याशिवाय, मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता, “मी ती क्लिप अद्याप ऐकलेली नसून पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आणि तिची सत्यता पडताळल्याशिवाय जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही,” असे सांगत सुप्रिया सुळे यांनी अधिक बोलणे टाळले. —————————————————— हेही वाचा… मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर: “जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा”; शिंदे-फडणवीसांना इशारा “मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 12 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation मराठा समाजात फूट पाडण्याचं मोठं षड्यंत्र!:मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर अर्जुन खोतकरांचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी Ajay Baraskar Slams Manoj Jarange Patil Over Eknath Shinde Controversy