काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘देशाचे सरकार अमेरिका आणि चीन चालवत असून, महाराष्ट्रात बिश्नोई गँग आणि सरकारचे त्रिकूट दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे’, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी चढवला आहे. तसेच, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय तणाव निर्माण करण्याचे पाप भाजपने केल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मोदी सरकार विदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधताना पटोले म्हणाले, “त्यांचा अभ्यास कमी पडतोय. आज अमेरिका आणि चीन आपल्या देशाला चालवत आहेत. अमेरिका जे आदेश देते, त्याचे पालन मोदी सरकारला करावे लागते. चीनने आपल्या देशावर अतिक्रमण केले आहे, पण पंतप्रधान मोदी त्यावर एक चकार शब्दही बोलत नाहीत. देशाचा पंतप्रधान अमेरिकेला सरेंडर होत आहेत आणि विदेशी व्यवस्था भाजपला चालवत आहे, याचा तरुणांमध्ये रोष आहे. हे तरुण देशासाठी आणि संविधानासाठी लढत आहेत.” ‘बिश्नोई गँग आणि सरकारचे त्रिकूट’ संजय राऊत यांच्या दाव्याचे समर्थन करत पटोले यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगवरून सरकारला धारेवर धरले. “बिश्नोई सध्या गुजरातच्या जेलमध्ये आहे आणि तिथूनच या सगळ्या कारवाया करत आहे. गुजरात आणि देशात भाजपचीच सत्ता आहे, मग राज्याचे आणि देशाचे गृहमंत्री झोपले आहेत का? विधानसभेत अकोल्याचे आमचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगची धमकी आल्याचा मुद्दा मी उपस्थित केला होता. तेव्हा जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे सरकारने सांगितले होते. पण तरीही टायगर श्रॉफची घटना घडली, ते थोडक्यात बचावले. महाराष्ट्राचे सरकार, केंद्रातले सरकार आणि बिश्नोई गँग यांचे कुठेतरी त्रिकूट आहे. लोकांना घाबरवण्यासाठीच अशी व्यवस्था केली जात आहे,” असा खळबळजनक आरोप पटोले यांनी केला. ‘मराठा-ओबीसी वाद हे महायुतीचे पाप’ मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित (५०० कोटींच्या) आरोपांवर थेट बोलणे टाळत पटोले यांनी भाजपवर जातीय राजकारणाचा आरोप केला. “मला जरांगे पाटलांबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. पण, महाराष्ट्रात ‘ओबीसी वर्सेस मराठा’ करून जातीय तणाव निर्माण करण्यात सरकारला यश आले आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा एकसंघ महाराष्ट्र विभागून स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्याचे पाप भाजप आणि महायुती सरकारने केले आहे. २०१४ पासून हे सरकार राज्याला विस्कळीत करण्याचे काम करत आहे,” अशी टीका त्यांनी केली. फडणवीसांवर खोचक टीका राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पटोले यांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली. “फडणवीस सरकारने फार महान कामं केलेली आहेत,” असा टोला लगावत त्यांनी राज्यातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ———————— हेही वाचा.. मनोज जरांगेंना श्रीकांत शिंदेंकडून 500 कोटी पोहोचलेत?: जरांगेंच्या पत्रकार परिषदेपूर्वीच कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, जुन्या सहकाऱ्याचा ‘ब्लॅकमेलिंग’चा पलटवार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर उपस्थित केलेल्या कथित 500 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीवरून राज्याचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे पुरावे जाहीर करणार असतानाच, त्याआधीच या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या कथित क्लिपमध्ये एका हिंदी भाषिक महिलेचा आवाज असून, “जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदेंकडून आधीच 500 कोटी रुपये पोहोचले आहेत,” असा खळबळजनक संवाद ऐकायला मिळत आहे. तथापि, दैनिक ‘दिव्य मराठी’ या कथिल व्हायरल ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation ज्या विषारी सापाला दूध पाजले, तोच आता शिंदेंना दंश मारतोय!:500 कोटींच्या वाटपावरून जरांगे-शिंदेंची नार्को टेस्ट, ईडी चौकशी करा – नवनाथ वाघमारे