. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवांतर्गत शुक्रवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बहुजन समाजातील परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडले. समता, न्याय, बंधुत्वाचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीने आकर्षक देखावे, देखावे, घोडे, स्वयंशिस्त समूह, क्रीडा मंडळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. भिक्खुसंघाची उपस्थिती. महापुरुषांच्या प्रतिमांचे फलक. चित्तथरारक कवायती. लेझीम पथक. मार्गावरील आकर्षक विद्युत रोषणाई. वाद्यांची साथ अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. “जयभीम’च्या जयघोषाने महानगर दुमदुमून गेले होते. यानिमित्ताने अनुयायांनी समतेचा संदेश िदला. सोहळ्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला होता. अकोल्यात सन १९८४ पासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी धम्म मेळावा आयोजित करण्याची परंपरा आहे. विजया दशमीच्या दुसऱ्या दिवशी यंदा बुधवारी धम्मचक्र दिन प्रवर्तन दिन सोहळा व मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन वाघाडीसह आघाडीची महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, िवद्वत सभेसह अन्य शाखांतर्फे सोहळा पार पडला. मिरवणुकीचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते कॉटन मार्केटजवळ रथावर विराजमान झाले. मिरवणुकीत प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, माजी आमदार नातिकोउद्दिन खतीब, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, जि.प. चे माजी गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, नगरसेवक पराग गवई, व्यापारी नेते मनोहर पंजवाणी, रामकुमार गव्हाणकर, आकाश सिरसाट यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मिरवणुकीचे अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमा : मिरवणुकीत बहुजन समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांच्या प्रतिमा वाहने, मिरवणूक मार्गावर लावण्यात आल्या. वाहनांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवांतर्गत मिरवणूक व धम्म मेळावा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी २० समित्यांचे गठन करण्यात आले. प्रत्येक समिती प्रमुखाची नेमणूक करुन त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी मिरवणूक काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर कापड बाजार चौकातून धम्मरथावर विराजमान झाले. रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. (फोटो : थ्री डिकेड्स प्रॉडक्शन, अकोला) अशी जपली परंपरा वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सन १९८४ पासून म्हणजे गत ४३ वर्षांपासून विजया दशमीच्या दुसऱ्या दिवशी भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. जागृतीचा विस्तव कधीही विझू देवू नका, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश शिरोधार्य मानून जनजागृतीसाठी निरंतर कष्ट घेण्यात येत आहेत. मिरवणुकीसह धम्म मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले. समता सैनिक दलाकडून करण्यात आले पथसंचलन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गत अनेक दिवसांपासून मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली. मिरवणुकीत बौद्ध भिक्खू संघ, लेझीम पथक, आखाडे, देखावे, पारंपरीक वाद्य, बॅड पथक, समता सैनिक दलाचे पथसंचलन हे खास आकर्षण होते. पथसंचलन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. अशी निघाली मिरवणूक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (रेल्वे स्टेशन) येथून प्रारंभ झाला. मिरवणूक श्री शिवाजी कॉलेज, अकोट स्टॅन्ड, टिळक रोड, मंगलदास मार्केट, महाराणा प्रताप चौक (सिटी कोतवाली) गांधी चौक, मदनलाल धिंग्रा चौक, टॉवर चौकातून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचली. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 7 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation यंदा सर्वाधिक गाळपआणि चांगला ऊस दर:बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी संजय अवताडेंचे प्रतिपादन ज्या विषारी सापाला दूध पाजले, तोच आता शिंदेंना दंश मारतोय!:500 कोटींच्या वाटपावरून जरांगे-शिंदेंची नार्को टेस्ट, ईडी चौकशी करा – नवनाथ वाघमारे