![]()
स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान सोनिया गांधी यांनी उपस्थितांना ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत पूर्ण गाण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप भाजपने केल्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस पक्षाने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले असले तरी, यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंदूक असलेला नक्षलवाद संपला. त्याहून खतरनाक हा दिमागी नक्षलवाद ज्या लोकांच्या डोक्यात अराजकता भरली आहे, असा नक्षलवाद पाहायला मिळत आहे. दुर्दैवाने त्याचा एक नमूना कॉंग्रेसच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. देशाच्या एकूण निर्णयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात वंदे मातरम् वाजवायचं, हा निर्णय संविधानाच्या अंतर्गत निर्णय घेतलेला होता. पूर्ण वंदे मातरम् वाजवण्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहे. हा दिमागी नक्षलवाद आहे. ही अराजकता आहे. हा संविधान शक्तीचा अपमान आहे. अशा परकरचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने पाहायला मिळत आहेत. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काय म्हणाले फडणवीस? महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यावरील काही प्रतिक्रिया बघितल्या. या फार सिलेक्टिव्ह प्रतिक्रिया आहेत. 2023 मध्ये या विधेयकाला मान्यता दिली. त्यावेळी दोन अटी टाकण्यात आल्या. सेन्सस पूर्ण करणे आणि डिलिमिटेशन करणे. त्यानंतरच महिला विधेयक लागू करण्याची अट घालण्यात आली. त्यामुळे जनगणना आणि डिलिमिटेशन पूर्ण होत नही, तोपर्यंत महिला विधेयक लागू होत नाही. जनगणनेला वेळ लागत आहे. काही विरोधी पालक्षांनी पाठिंबा दिला नाही. मागील वेळी दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने एक विधेयक पडले. आज देखील 2023 च्या विधेयकासारखी परिस्थिती आहे. त्या विधेयकाप्रमाणे आरक्षण द्यायचे असेल. ‘वेडा बनून पेढा खाणे’ बंद करा पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनगणना आणि डिलिमिटेशन करणे हाच पर्याय आहे. त्याचबरोबर आता नव्याने संविधान संशोधन मांडणे हाच पर्याय आहे. 2023 साली एका मताने हे विधेयक मान्य केले. परंतु दोन अटीशिवाय महिलांना आरक्षण दिले जाऊ शकत नाही. ते द्यायचे असेल, तर नवीन विधेयक आणावे लागेल. सर्व माहीत असताना, बोली भाषेनुसार ‘वेडा बनून पेढा खाणे’ बंद करा. महिला आरक्षणाला समर्थन द्यायचे असेल, तर विरोधकांनी दोन-तृतियांश पाठिंबा द्यावा. तरच महिला आरक्षणाला मिळेल. नाही तर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे विरोधी पक्षाने करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
'हा तर दिमागी नक्षलवाद':वंदे मातरम'च्या वादावरून देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींवर हल्लाबोल, काय म्हणाले मुख्यमंत्री?

