टायगरआधी बिग बी, अक्षय, आमिरची रेकी; सुरक्षा पाहून प्लॅन बदलला:तिन्ही आरोपींचा मोठा गौप्यस्फोट

देश-विदेश

[ads1]


टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे आरोपी मुंबईत मोठा कट रचण्यासाठी पोहोचले होते. मुंबई गुन्हे शाखा आणि कोटा पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या निशाण्यावर अमिताभ बच्चन (बिग बी), आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यासह अनेक मोठे स्टार होते. आरोपींनी (रिहान, रितिक आणि फूल सिंह) या अभिनेत्यांच्या घरांची रेकी केली होती आणि व्हिडिओ अनिल पंडितला पाठवले होते. तिथे कडक सुरक्षा पाहून त्यांनी प्लॅन बदलला आणि कमी सुरक्षा असलेल्या प्रसिद्ध स्टारचा शोध सुरू केला. याच आधारे त्यांनी टायगरला लक्ष्य म्हणून निवडले. कारण तो दर रविवारी संध्याकाळी फुटबॉल खेळायला येतो. त्याच्यासोबत फक्त ड्रायव्हर असतो. ७ दिवस रेकी केल्यानंतर रविवारी आरोपी तिथे पोहोचले आणि त्यांनी टायगरच्या कारवर गोळीबार केला. मोठ्या अभिनेत्यांवर हल्ल्याचे आदेश होते कोटा पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सांगितले, त्यांना १ महिन्यापूर्वी मुंबईत पाठवले होते, तेव्हा लॉरेन्स टोळीचा हस्तक अनिल पंडितने मोठ्या बॉलिवूड स्टारला लक्ष्य करण्यास सांगितले होते. आधी त्यांनी अमिताभ, आमिर, अक्षय व सलमानला लक्ष्य बनवले. ते रोज त्यांच्या घराबाहेरून जात असत. पण, तेथील कडक सुरक्षा पाहून त्यांनी हा प्लॅन सोडून दिला. टायगरवर गोळीबारासाठी शूटर्सपर्यंत शस्त्रे पोहोचवल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ४ जणांना अटक केली. यात सोनीपतच्या कुणाल (२१), सुमित (१९), राधा (२३) व बबिता (२३) यांचा समावेश आहे. राधा व बबिता ट्रेनने हत्यारे घेऊन मुंबईला गेल्या होत्या. तिथे लॉरेन्स टोळीच्या हँडलरकडे ती सोपवून त्या परतत होत्या. मुंबई पोलिसांना ३ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे. ट्रेनने पोहोचवली शस्त्रे, ४ जणांना अटक चौथा साथीदारही होता, पण घाबरून पळून गेला : आरोपींनी गुगलवरून टायगरची माहिती काढली होती. त्यांनी ठरवले होते की, सेल्फी घेण्याच्या बहाण्याने ते कारजवळ पोहोचून गोळीबार करतील. पण पार्कबाहेर गर्दीमुळे आरोपींनी थेट गोळीबार केला. आरोपींसोबत चौथा तरुणही होता, पण तो हल्ल्याच्या एक रात्र आधी सिगारेट ओढण्याच्या बहाण्याने पळून गेला.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry