नांदेडमध्ये भोंदू महाराजाकडून विधवा महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

0
Oplus_131072

Oplus_131072

नांदेडमध्ये भोंदू महाराजाकडून विधवा महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

नांदेड : शहरातील धार्मिक वातावरणाला धक्का देणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेत एका भोंदू महाराजाने विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीपुरा परिसरातील एका मठाचा मठाधिपती हरिगिरी दत्तगिरी महाराज (वय 39) याने 46 वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला मे 2025 पासून मठात दर्शनासाठी जात होती. त्या दरम्यान महाराजाशी तिची ओळख झाली आणि तिने त्याला ‘गुरू’ मानले होते.

मात्र, आरोपीने तिच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत सतत संपर्क साधत तिला जाळ्यात ओढले. 14 जुलै 2025 रोजी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो पीडितेच्या घरी गेला आणि तिथेच पहिल्यांदा जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही बाब कुणालाही सांगू नये म्हणून लग्नाचे आश्वासन देत त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

काही काळानंतर पीडितेने लग्नासाठी आग्रह धरला असता, “मी संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही,” असे सांगत आरोपीने हात झटकले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने धाडस करून भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात संतापाची लाट उसळली असून, अशा भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed