झोटा यांना न्याय देण्यासाठी पंजाबी कलाकार पुढे आले:मूसेवालांचा शो रद्द, बब्बू मान-रणजीत बावा कुटुंबीयांना भेटले, दिलजीतने शहीद म्हटले

मनोरंजन




मानसा येथे परविंदर सिंह झोटा यांच्या हत्येनंतर पंजाबी कलाकारांच्या मौनावर प्रश्न उपस्थित होत असताना आता अनेक कलाकार त्यांच्या कुटुंबाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. सोशल मीडियावर कलाकारांना पंजाबमधील मुद्द्यांवर ते कधी बोलणार, असा सवाल केला जात होता. आता सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी १९ ऑक्टोबर रोजी होणारा मुलाचा ‘साइन टू गॉड’ शो रद्द केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्यासाठी आधी मानसा आहे आणि त्यानंतर मुलाचा दौरा. दरम्यान, गायक रणजीत बावा, बब्बू मान आणि आर नेत झोटा यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचले. तर दिलजीत दोसांझ यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये झोटा यांना हुतात्मा संबोधत कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवा यांनीही आपल्या ‘थापी’ चित्रपटाचे स्क्रीनिंग थांबवण्याची घोषणा केली आहे. मेडिकल स्टोअरमध्ये अमली पदार्थांची विक्री करण्यास विरोध केल्यामुळे १३ ऑक्टोबर रोजी झोटा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कुटुंबीय धरणे आंदोलनाला बसले असून, आज त्याचा सातवा दिवस आहे. अद्याप मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले नाही. सीबीआय चौकशीसह पाच मागण्या पूर्ण करण्यावर कुटुंबीय ठाम आहेत. झोटाच्या हत्येबाबत कोणी काय म्हटले, जाणून घ्या… सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी ही पोस्ट शेअर केली…

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry