'माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा':पंकजा मुंडेंचे भगवान बाबांना साकडं; सावरगावच्या दसरा मेळाव्यात यंदा दुष्काळावर करणार भाष्य

महाराष्ट्र




राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतातील पिकं करपून गेली असून बळीराजाच्या तोंडचा घास हिरावून नेला आहे. त्यात आता दसरा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. दसरा मेळाव्यात मंत्री पंकज मुंडे दुष्काळ परिस्थितीवर भाष्य करणार असल्याची समजते. ‘माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा’, अशी प्रार्थना भगवान बाबांकडे करणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यावरही भाष्य केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावा हा माझ्यासाठी भावनिक विषय आहे. जोपर्यंत मी सावरगाव घाट येथील मंचावर उभी राहत नाही आणि भाषण करत नाही, तोपर्यंत मनात धाकधूक असते. हा मेळावा लोकांचा असून, भगवान बाबांना त्यांच्या जन्मगावी आणण्याचे भाग्य आपल्याला लाभले. या मेळाव्याला कोणताही राजकीय अजेंडा नसून लोक भक्ती आणि प्रेमापोटी येतात. मागील मेळाव्यात व्यसनमुक्ती आणि स्त्रीभ्रूण हत्येसारख्या विषयांवर आपण भाष्य केले होते. यंदा दुष्काळ परिस्थितीवर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच यंदा पहिल्यांदाच नावरात्रीचे व्रत ठेवले असून, आपल्या लोकांसाठी पाऊस पाडावा, अशी प्रार्थना भगवान बाबांकडे करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री कोणालाही सोडणार नाहीत दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, देश आणि राज्य यशाच्या महामार्गावर असतात त्यावेळेस काही वाईट प्रवृत्ती डोके वर काढत असतात, त्यांचा फना तिथेच ठेचला पाहिजे, त्यांना तिथेच नेस्तनाबूत केले पाहिजे. मुख्यमंत्री यावर कठोर पावले उचलतील. मुंबई सुरक्षित करण्यात मुंडे साहेबांनी खूप मोठे काम केले आहे, हे कोणीही विसरू शकत नाही. आता ही मुंबई सुरक्षित आहे. एखाद-दुसरी घटना झाल्या तरी गृहमंत्री खंबीर आहेत, मुख्यमंत्री कोणालाही सोडणार नाहीत, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. नवरात्रीच्या व्रताविषयी काय म्हणाल्या मुंडे? तसेच नवरात्रीच्या व्रतासंदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, नवरात्रीच्या पवित्र पर्वात शक्तीची पूजा आणि उपासना केली जाते. यंदा आपल्याला कन्यापूजन करण्याचे भाग्य मिळाले. आम्हा दोघींनाही मुले आहेत, मुलगी नाही. त्यामुळे आज कन्यापूजनाच्या माध्यमातून ती हौस पूर्ण करून घेतल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry