औद्योगिक भेटीदरम्यान कंपनीचे युनिट हेड दीपक ए. गुने, प्रॉडक्शन मॅनेजर सागर एस. तारे, अविनाश खटावकर (जनरल मॅनेजर ), सुरेश जगदाळे (सिनियर ऑफिसर) तसेच ज्युनिअर ऑफिसर गणेश सालोखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कंपनीची उत्पादन प्रक्रिया, विविध हर्बल व फाइटो-फार्मा उत्पादने, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कार्य, तयार उत्पादनांचे विश्लेषण व मूल्यमापन (Analysis & Evaluation of Finished Products), तसेच उद्योगातील विविध नोकरी संधी व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्पादन विभाग, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा आणि पॅकिंग विभागास प्रत्यक्ष भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली.
सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांनीही महाविद्यालयीन शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अशा औद्योगिक भेटी आयोजित करण्यास प्रोत्साहित केले. या शैक्षणिक सहलीत प्राचार्य डॉ. विजय विठ्ठलराव नवघरे यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळावा, त्यांच्या ज्ञानात भर पडावी व रोजगारक्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने त्यांनी अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
सदर दौऱ्यात डॉ. पल्लवी कांबळे, माधव डाकोरे, कु. श्रद्धा देशमुख व शुभम जाधव हे प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. औद्योगिक भेटीचे नेतृत्व डाकोरे यांनी केले. सहलीचे नियोजन, उद्योगाशी समन्वय, विद्यार्थ्यांची सुरक्षितता व शिस्त यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.
विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीद्वारे औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज, गुणवत्ता मानके, तसेच उद्योगातील व्यावसायिक संधींबाबत मौल्यवान अनुभव मिळाल्याची भावना व्यक्त केली. महाविद्यालयाकडून भविष्यातही अशा शैक्षणिक व औद्योगिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
