राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता शहरात आगमन झाल्यानंतर त्या पद्माकर मुळे यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सूर्यकांता गाडे यांच्या संस्थेला भेट देतील. दुपारी मौलाना आझाद संस्थेच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात शहर व ग्रामीण जिल्हा आढावा बैठकीला मार्गदर्शन करतील.
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%