देगलूर (प्रतिनिधी)- होळीच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी संताप व्यक्त करत पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून हा प्रकार म्हणजे पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा आणि थेट गळचेपी करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
होळीच्या पार्श्वभूमीवर लोक ऊर्जा या साप्ताहिकाने बुरा ना मानो होली है हा विशेष अंक प्रकाशित केला होता. या अंकात देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावरील एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. हे व्यंगचित्र आमदारांना खटकले असून त्यांनी संताप व्यक्त करत आपल्या कार्यकर्त्यांकडून थेट पत्रकाराविरोधात तक्रार दाखल करण्याचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
आमदारांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांनी लोक ऊर्जा चे संपादक पत्रकार कपिल उल्लेवार यांच्या विरोधात बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून लोकशाहीत व्यंगचित्र हे टीकेचे एक माध्यम असताना त्यावरून पत्रकारांना लक्ष्य करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
पत्रकार संघटनांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी टीका सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही पत्रकार संघटनांकडून देण्यात आला आहे.

व्यंगचित्रकार म्हणून भारतात आर के लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कुणाकुणाविरुद्धचे व्यंगचित्र बनवले होते पण त्यांच्याविरुद्ध कोणी तक्रार दिली नव्हती. सोबतच आ. जितेश अंतापूरकर यांना या व्यंगचित्रामुळे त्रास झाला असेल तर 32 लोकांच्या स्वाक्षऱ्या असलेला अर्ज देण्याची काय गरज होती. त्यांनी स्वतःच अर्ज का दिला नाही असेही प्रश्न समोर येत आहेत. परंतु व्यंगचित्र हा काही कोणाला त्रास देण्याचा प्रकार नसतो आणि तो अभिव्यक्तीचा एक भाग आहे.अभिव्यक्तीच्या भागातूनच त्या व्यंगचित्राची निर्मिती होत असते व्यंगचित्राची निर्मिती ही काही कोणाला त्रास देण्यासाठी केलेलीच नसते परंतु त्यातून एक बोध त्या व्यक्तीने घ्यायचा असतो ज्याच्याबद्दलचे ते व्यंगचित्र आहे एवढाच त्या व्यंगचित्राचा खरा अर्थ असतो म्हणून पत्रकारांमध्ये आ. जितेश अंतापूरकर यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला अर्जाविरुद्ध पत्रकारांमध्ये रोष व्यक्त होत आहे.