Jyoti Waghmare Emotional After Rajya Sabha Nomination; Thanks Eknath Shinde



महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ज्योती वाघमारे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्या अत्यंत भावूक झाल्या. “ज्या मुलीने ल

.

ज्योती वाघमारे म्हणाल्या, “मी अत्यंत साधी आणि गरीब मुलगी आहे. आयुष्यात भाकरीसाठीचा संघर्ष जवळून पाहिला असून लहानपणापासून भुकेचे चटके सोसले आहेत. अशा परिस्थितीत कोणताही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या दलित समाजाच्या मुलीला देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाण्याची संधी मिळेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते,”

भाकरीच्या संघर्षापासून संसदेपर्यंतचा प्रवास

आपल्या भावनांना वाट करून देताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली, तेव्हाच मला वाटले होते की आयुष्यात सर्व काही मिळाले. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही संधी माझ्यासाठी अनपेक्षित आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ‘शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म’. आज कुठल्याही आरक्षणाची जोड नसताना केवळ कर्तृत्वाच्या जोरावर मुख्यमंत्र्यांनी मला ही संधी दिली आहे,” असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.

ज्योती वाघमारे म्हणाल्या, ही माझी उमेदवारी नाही तर जिजाऊंच्या हातच्या तलवारीची आहे, सावित्री माईच्या हाताच्या पाटीची आहे, बाबासाहेबांच्या हातच्या लेखनीची ही उमेदवारी आहे. तसेच कंबर कसून कष्ट करणाऱ्या लाडक्या बहिणीची देखील आहे. या उमेदवारीतून एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्येक लाडक्या बहिणीला आश्वासित केले की, हा बंधू तुमच्या पाठीशी आहे.

संधीचे सोने करणार

“माझ्यावर जो विश्वास टाकला गेला आहे, त्याचे मी नक्कीच सोने करेन. सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावेन,” असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोणत्याही घराणेशाहीचा वारसा नसलेल्या एका सामान्य कार्यकर्तीला मिळालेली ही उमेदवारी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

ज्येष्ठांच्या नाराजीवर ‘भावनिक’ उत्तर

राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत विचारले असता ज्योती वाघमारे यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, “मला मोठे राजकारण कळत नाही. ज्येष्ठ नेत्यांचे पक्षासाठी असलेले योगदान खूप मोलाचे आहे. मात्र, माझे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयासोबत सर्व जण राहतील, असा मला विश्वास आहे. एका वारसा नसलेल्या मुलीला संधी मिळाल्याचा आनंद सर्वांनाच होईल., असा मला विश्वास आहे.”

हे ही वाचा…

ज्योती वाघमारेंना कामामुळे राज्यसभेची उमेदवारी:पवारांच्या विनंतीनंतर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय – एकनाथ शिंदे

“शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले. तोच वारसा पुढे चालवत आम्ही सोलापूरच्या एका अतिशय सामान्य कुटुंबातील डॉ. ज्योती वाघमारे या ‘लाडक्या बहिणीला’ राज्यसभेची संधी दिली आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ज्योती वाघमारे यांची निवड ही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचा सन्मान असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच शरद पवार यांच्या विनंतीमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतल्याचेही शिंदे म्हणाले. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *