सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी  15 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी इच्छुक सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयाकडे 15 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
सन 2024-25 व 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या वरील पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून 15 मार्च 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित वर्षासाठी विहित अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. पुरस्कारासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी ते 31 डिसेंबर असा विचारात घेण्यात येईल. सन 2024-25 या वर्षासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 असा राहील. सन 2025-26 या वर्षासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 असा राहील.

विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड येथे तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


Post Views: 66






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *