कुऱ्हा पोलिसांची काळागोटा येथे गावठी दारू भट्टीवर धाड:3 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना अटक




होळी आणि धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर कुऱ्हा पोलिसांनी काळागोटा येथे गावठी दारू भट्टीवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत धीरज भोसले आणि अंजु राजू पवार या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींवर गावठी हातभट्टी दारू काढून तिची विक्री केल्याचा आरोप ठेवला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये मोहाचा सडवा आणि तयार गावठी हातभट्टी दारूचा समावेश होता. हा सर्व मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार एपीआय सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक विलास थुल, पोलीस अंमलदार सोमेश्वर सपाटे, अनिल निंघोट, उमेश वाघमारे, हेमंत कलाने, हेमंत डहाके, योगेश चौधरी, करुणा रायबोले, प्रिती हिरेखन, अरविंद गिरी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *