पावसाचा फटका:आठ तालुक्यातील 57 हजार‎ हेक्टरवरील पिकांचे नुकसान‎, विक्रमी 40 मंडळांत अतिवृष्टींची झाली नोंद




अमरावती जिल्ह्यात ३० ते ३१ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार आणि काही तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पूर्वी सोयाबीनच्या बियाण्यांमुळे बसलेला फटका ताजाच असताना आता अतिपावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील तब्बल ४१९ गावांतील ५७ हजार ६८९ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील शेतीपिकांना या पावसाचा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि धान यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. उभी पिके सडण्याच्या मार्गावर आहेत. ३० ते ३१ जुलै दरम्यान जिल्ह्यात तब्बल ७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४० महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तीन ते चार दिवस मध्यम पाऊस जिल्ह्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत आगामी तीन ते चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. मात्र हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे. या पावसासोबतच काही ठिकाणी विजांचा कडकडाट होणार आहे. वाऱ्याचा जोरही कायम राहणार. अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये नदीतील दगडांचा असा खच साचला होता. या दरम्यान जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अमरावती आणि भातकुली या पाच तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे या पाच तालुक्यांतील तब्बल २१ महसूल मंडळांत चोवीस तासांत १०० मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. आहे. तालुकानिहाय शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला असता, नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याचे समोर आले आहे. या तालुक्यातील १०१ गावांतील तब्बल ३१ हजार १५१ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस आणि तुरीचे पीक बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ मोर्शी तालुक्यातील ८५ गावांमधील १९ हजार ५०६ हेक्टर, भातकुली तालुक्यातील ११५ गावांमधील ४ हजार ५२१ हेक्टर, आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील ७५ गावांमधील २ हजार १३८ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. तसेच धारणी तालुक्यात १३५.४० हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात २३४ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ३ हेक्टर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात १.४० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. डॉ. प्रवीणकुमार, शास्त्रज्ञ, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *