या प्रकरणातील नियमित फौजदारी खटला क्रमांक 988/2002 मधील आरोपी सज्जाद हुसेन पिता जाफर हुसेन, रा. सिटीजन हॉटेलच्या मागे, रेल्वे स्टेशन रोड, नांदेड हा फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित आरोपी अथवा त्याच्या नातेवाईकांना ही माहिती मिळून आरोपीने न्यायालयासमोर हजर राहावे, या उद्देशाने ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे
