५ जानेवारी २०२२ रोजी हिमायतनगर येथील घारापूर फाटा परिसरात प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेख इम्रोज शेख जलील यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख इम्रोज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर फिर्यादीही गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३०७, ३२६, ३२४, १०९, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळ पंचनामा, जखमी व साक्षीदारांचे जबाब, शस्त्र व कपड्यांची जप्ती तसेच वैज्ञानिक पुरावे संकलित करून भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या ट्रायल मॉनिटरिंग सेल मुळे खटल्याचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनुराधा डावकरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पोलीस उपनिरीक्षक नईम खान व हेड कॉन्स्टेबल रमेश आडे यांनीही खटल्यात मोलाचे सहकार्य केले. या प्रभावी तपास आणि सक्षम न्यायालयीन पाठपुराव्यामुळे मुख्य आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यश आल्याचे पोलीस प्रशासनाने नमूद केले आहे
