रामचेत यांच्या बुटाच्या दुकानात पुन्हा एकदा राहुल गांधी; एका वर्षापूर्वीची आठवण आणि आजची संवेदना
गेल्या वर्षी याच रस्ताने जाताना राहुल गांधींचे लक्ष या निर्जन दुकानावर गेले. देव जाणे, त्यावेळी त्यांच्या मनात काय विचार आला असावा, पण ते या दुकानात थांबले. दुकानाचे मालक रामचेत यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधींनी केवळ बूट पाहिले नाहीत, तर रामचेत यांच्यासोबत बसून बूट बनवण्याचे धडे घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामचेत यांनी त्यांना सांगितले होते, हे करणे फार सहज आहे. या एका ओळीवरून दोघांमध्ये बरीच चर्चा झाली, बराच वेळ राहुल गांधींनी रामचेत यांना दिला आणि नंतर ते आपल्या कामाला निघून गेले.
पण राहुल गांधी विसरले नव्हते. दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींच्या वतीने आलेली मशीन कार्यकर्त्यांनी रामचेत यांना भेट दिली. या मशीनमुळे हाताने करावे लागणारे अवघड काम आता सहज शक्य होणार होते. रामचेत आता जास्त बूट बनवू शकणार होते, त्यांचा व्यवसाय वाढू शकणार होता. रामचेत आणि त्यांचे कुटुंबीय ही भेट घेऊन एवढेच थांबले नाहीत, तर ते कुटुंबीयांसह दिल्लीला राहुल गांधींना भेटायलाही गेले. त्यांनी राहुल गांधींसाठी खास बूट बनवला होता, जो राहुल गांधींनी परिधानही केला. त्या भेटीत खासदार सोनिया गांधी यांच्याशीही रामचेत कुटुंबाची भेट झाली आणि आनंदाचे वातावरण होते.
यानंतर रामचेत यांचे दुकान प्रसिद्ध झाले. राहुल गांधी ज्या दुकानात बसले, जिथे त्यांनी बूट बनवायला शिकण्याचा प्रयत्न केला, ते दुकान म्हणून रामचेत यांची विक्री वाढली. पण याच काळात त्यांनी राहुल गांधींना आपली व्यथा सांगितली होती. महिन्याला पाच-सहा हजार रुपये येतात, त्यात कुटुंब चालवायचे आहे. आणि मला टीव्हीचे (हृदयविकार) आजार आहे, त्यावर उपचार सुरू आहेत, असे रामचेत यांनी सांगितले. त्यावेळी राहुल गांधींनी विचारले होते, आयुष्मान योजनेतून तुमच्या आजारावर काही मदत मिळते का? तर रामचेत यांनी सांगितले की, या योजनेतून त्यांना काहीही मदत मिळत नाही.
चाळीस वर्षांपासून रामचेत हे बूट बनवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांचे वडीलही हाच व्यवसाय करत होते, आणि आता त्यांची मुलेही हाच व्यवसाय करत आहेत. राहुल गांधींनी त्यांना विचारले होते, मशीन घ्यायची असेल तर किती पैसे लागतील? रामचेत यांनी सांगितले, मशीन पंचावन्न हजार रुपयांना मिळते, पण माझ्याकडे पैसे नाहीत. राहुल गांधींनी पुढे प्रश्न केला, मशीन मिळाली तर उत्पन्न किती वाढेल? उत्तर होते, उत्पन्न दुप्पट होईल. या संवादानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींच्या कार्यकर्त्यांनी रामचेत यांना ते मशीन आणून दिले. उत्पन्न दुप्पट होण्याचे स्वप्न साकार होत असतानाच दुर्दवी प्रकार घडला होता. तो प्रकार खा. राहुल गांधी यांना पण कळला होता. म्हणूनच, आज जेव्हा राहुल गांधी पुन्हा या दुकानासमोर थांबले, तेव्हा रामचेत यांच्यात या जगात नव्हते. गेल्या वर्षभरात रामचेत यांचे निधन झाले. तरीही राहुल गांधी यांनी त्या कुटुंबाला भेटून तुमच्या कुटुंबाशी माझी जवळीक आहे ही भावना दाखवली.
आता या घटनेनंतर मनात प्रश्न उभे राहतात…
राजकारण हे केवळ सत्तेसाठीच असते का, की माणूस म्हणून समाजातील शेवटच्या व्यक्तीशी जोडले जाण्याचेही असते? एकदा भेट दिली, एकदा मदत केली, की संबंध संपतात की त्याला कालांतरानेही जपण्याची संवेदना असते? रामचेत यांच्या कुटुंबाशी राहुल गांधींनी दाखवलेली ही जवळीक नेमकी काय सांगते?
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एका गरीब कारागिराच्या चाळीस वर्षांच्या कष्टाचे, त्याच्या व्यवसायाचे, त्याच्या विकाराच्या व्यथेचे आणि शेवटी राहुल गांधींसारख्या नेत्याने दाखवलेल्या या माणुसकीचे वास्तव आपल्या लेखणीतून उतरवताना, जर आपण त्याच्या या कृतीची प्रशंसा केली नाही, तर आपण आपल्या लेखणीशी बेईमानी केल्यासारखे होणार नाही का?

