MHT-CET 2026 Exam Scam Allegation; Teacher Video Sparks Controversy


देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटीच्या वादात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच, आता महाराष्ट्रात ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET 2026) परीक्षेत ‘नीट’पेक्षाही मो

.

सचिन सावंतांचा राज्यातील पहिला ‘बॉम्ब’

काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी महाराष्ट्रातील MHT-CET घोटाळा सर्वात आधी समोर आणला होता. ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेत जेमतेम ३५ ते ४० टक्के गुण मिळाले आहेत, त्यांना सीईटी परीक्षेत चक्क ९० ते १०० पर्सेंटाईल कसे काय पडू शकतात? असा गंभीर सवाल सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, या धक्कादायक निकालाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

महादेव बालगुडे यांचा ‘व्हिडिओ’ प्रहार

सचिन सावंत आणि आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर, आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी या आरोपांना आणखी बळकटी दिली आहे. बालगुडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया ‘एक्स’ (X) हँडलवरून एका शिक्षकाच्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओची लिंक शेअर केली आहे.

“हे स्वतः एक शिक्षक आहेत. MHT-CET घोटाळा कसा झाला, यावर त्यांचा पूर्ण व्हिडिओ या लिंकवर बघा. जेव्हा पत्रकार किंवा शिक्षकांसारखी अराजकीय मंडळी पुराव्यांसह बोलतात, तेव्हा जनतेचा त्यांच्यावर नक्कीच विश्वास बसतो. हा घोटाळा सर्वात आधी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उघडकीस आणला होता,” अशी पोस्ट करत बालगुडे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

व्हिडिओतील दावे; अधिकृत पुष्टी अद्याप नाही

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांना कथितरीत्या पैशांच्या जोरावर जास्त गुण मिळाल्याचा, मेरिटमध्ये अनियमितता झाल्याचा आणि परीक्षा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. संबंधित आरोपांबाबत परीक्षा प्राधिकरण किंवा राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी होणार का आणि पुढे कोणती कारवाई केली जाणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातमी वाचा..

NEET सारखाच घोटाळा MH-CET परीक्षेतही!: बारावीला 35-40 टक्के असणाऱ्यांना CET मध्ये 100 पर्सेंटाईल कसे? सचिन सावंतांचा सवाल

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आणखी एक गंभीर गौप्यस्फोट केला आहे.

सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर जर तरुण पिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूक आहे. नीट पेपरफुटीची चौकशी सुरू असली तरी अशा प्रकारच्या चौकशीतून पुढे काहीही निष्पन्न होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. तसेच नीट सारखाच गडबड घोटाळा MH-CET परीक्षेतही झाला आहे. दहावी बारावीला जेमतेम 35-40 टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना MH-CET परीक्षेत 100 पर्सेंटाईल पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *