हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाचा भाजपकडून समाचार:हिंदूवर अत्याचार करणारा टिपू सुलतान शिवरायांच्या समकक्ष कसा?- रवींद्र चव्हाण




ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे वादग्रस्त विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. यावरून आता भाजपकडून टीकेची झोड उठवली गेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सपकाळांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. काशी की कला जाती, मथुराभी मस्जिद होती, शिवाजी ना होते, तो सुन्नत सबकी होती… या ओळींनी रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या ट्विटला सुरुवात करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, अठरा पगड जातीधर्मांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य उभारलं ते रयतेच्या सुखासाठी आणि देव-देश-धर्माच्या रक्षणासाठी. अशावेळी केवळ स्वतःचे संस्थान वाचवण्यासाठी ब्रिटीशांशी लढणारा, मंदिरं फोडणारा आणि हिंदूवर अनन्वित अत्याचार करणारा टिपू सुलतान शिवरायांच्या समकक्ष कसा असू शकतो? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केलया. तसेच असे विचार फक्त काँग्रेसच्याच मोगलाई मानसिकतेतून येतात, अशी टीका त्यांनी केली आहे. पुढे रवींद्र चव्हाण म्हणतात, या मोगलाई मानसिकतेचे दर्शन घडवणारे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘काँग्रेसनिष्ठा’ जपली, पण महाराष्ट्राशी असलेली निष्ठा मात्र पायदळी तुडवली आहे. सपकाळजी, तुमचा जन्म छत्रपतींच्या महाराष्ट्रात झालाय याचा विसर पडू देऊ नका, असे चव्हाण म्हणाले. तसेच या मोगलाई मानसिकतेमुळेच महाराष्ट्राने काँग्रेसला वेळोवेळी नाकारले आहे. महाराष्ट्राच्या हिंदवी अस्मितेला धक्का लावू नका! नाहीतर… ज्या मातीने औरंगजेबाची कबर खोदली, तीच माती काँग्रेसच्या या ‘मोगलाई’ मानसिकतेचा पार चक्काचूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे:ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे; हर्षवर्धन सपकाळांचे वादग्रस्त विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वादग्रस्त विधान करत महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फोडले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *