घातपात असेल तर सिद्ध होईल:अजित पवारांच्या अपघातावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट


हा घातपात असेल तर ते सिद्ध होईल आणि सिद्ध झाले तर दोषींना शिक्षा मिळेल. तसेच अजित पवारांच्या अपघातासंबधित प्रश्न उपस्थित केले जात असतील तर त्याचे निराकरण देखील व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांवर प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, रोहित पवारांनी काकांना गमावले आहे. त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांनी उपस्थित केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. नाना पाटेकर म्हणाले, अजित पवार माझ्या लहान भावासारखे होते, चांगले मित्र होते. मी त्यांना नेहमी मिस करेन. तसेच सुनेत्रा पवार यांचे दुःख इतरांपेक्षा वेगळे आहे. ते त्यांनाच सहन करावे लागेल. पण, त्यांनी जो पदभार स्वीकारला आहे त्याची जबाबदारी देखील सांभाळावी लागेल आणि ती जबाबदारी त्या सांभाळतील, पण वेळ तर लागेलच. घातपात असेल तर ते सिद्ध होईल आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हा घातपात असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. यावर बोलताना नाना पाटेकर म्हणाले, रोहित पवारांनी काकांना गमावले आहे. त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांनी उपस्थित केले. आणि हा घातपात असेल तर ते सिद्ध होईल आणि सिद्ध झाले तर दोषींना शिक्षा मिळेल. तसेच अजित पवारांच्या अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात असतील तर त्याचे निराकरण देखील व्हायला हवे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर प्रश्न विचारला असता नाना पाटेकर यांनी तो त्यांचा निर्णय आहे. मला निर्णय घेता आला असता तर मी सांगितले असते, पण ते माझ्या हातात नाही, असे म्हणत त्यांनी विलीनीकरणावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. अजित पवार माझ्या छोट्या भावासारखे होते पुढे बोलताना नाना पाटेकर म्हणाले, अजित पवार 19-20 वर्षांचे होते तेव्हापासून माझी त्यांची मैत्री होती. कार्यकर्ता म्हणून काम करत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. जिथून त्यांनी सुरुवात केली आणि ज्या पदापर्यंत झेप घेतली तो प्रवास कमालीचा होता. राजकीय सोडून द्या, पण त्यांना नेहमी मिस करेन. माझ्या छोट्या भावासारखे होते अजित पवार, चांगले मित्र होते, अशी भावना पाटेकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks