योजना सुरू… समस्या कायम — शहर विकासाचा वास्तव अहवाल


शहर बदललं म्हणे… समस्या मात्र जागच्या जागी ; घोषणा मोठ्या… वास्तव कटू

नांदेड – सुप्रभात… सर्वांना… वरील पत्रिका वाचली… हसू आले… २४ तास पाणी…. ? ते ही मिटर ने… हा प्रकार म्हणजे तू कर मारल्या वाणी.. म्या करतो रडल्या वाणी…. ज्या शहरात महापालिका स्थापन होऊन अनेक वर्षे झाली पहिले वर्ष वगळता गेली २४ वर्षे या शहरात आठवड्यातून दोन वेळा पाणी येते.. जे पाणी पिण्यास घातक आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे… असे मी म्हणत नाही… पाणी तपासणीचा अहवाल सांगतोय…. गेल्या चार वर्षात शहरातील गोदावरी नदीत हजारो मासे मेले त्याचा खेद ना खंत… आमचे एडमिन गौतम जैन यावर पोटतिडकीने लिहितात निवेदन देतात.. मात्र संवेदना नसलेले अधिकारी यावर चौकशी करतो असे उत्तर देऊन मोकळे होतात.. अनेक नाल्याचे पाणी पवित्र गोदावरी नदीत येऊन मिळते आणि धडधडीत समोर दिसताना त्यावर गेल्या २० वर्षात काही होऊ शकले नाही… सत्ताधारी तेच आहेत फक्त चिन्ह आणि पक्ष बदलला आहे.. जिथे आठवड्यातून दोन वेळा पाणी मिळण्याची मारामार तिथे एका भागात २४ तास पाणी मिळणार म्हणे… बघू या… दुसरीकडे अविरत कक्ष ..आज ज्याचे लोकार्पण होत आहे .. म्हणजे आणखी एक विनोद.. उदाहरण घ्यायचे झाल्यास… शहरातील जन्म मृत्यू नोंदणी विभाग… किती दिवसात मिळाले पाहिजे हे प्रमाणपत्र… लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न… दुर्देव या विभागात हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी खेटा मारायला लागतात शिवाजीनगर झोन मधील फायर ब्रिगेड जवळ एक ऑफिस आहे तेथील माझा अनुभव खूप रंजक आहे तीन महिने झाले एक महिला आपल्या सासऱ्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपड करीत होती.. सतत कुठली तरी कारणे सांगून तिची टाळाटाळ केली जात होती.. त्या महिलेने मला फोन केला आपली व्यथा सांगितली मी वैतागून संबंधित मंडळी ला फोन केला विशेष म्हणजे ती ही महिला कर्मचारी होती… माझा फोन गेल्यावर जे सर्वर गेली तीन महिने डाऊन होते… ते लगेच सुरू झाले…. म्हणजे बाकी ओळखून घ्या.. परवा वास्तव न्यूज़ लाईव्ह ने सुंदर बातमी लिहिली होती… माहिती अधिकारात प्रथम महापौर सुधाकर पांढरे साहेब याना मिळालेले उत्तर … महापालिकेने च दिले आहे… कार्यालयातील अनेक महत्वाच्या फाईल गहाळ झाल्याची बातमी होती ती.. वास्तव न्यूज़ कुठलीही बातमी पुरावा मिळाल्या शिवाय लिहीत नाही.. शहानिशा केल्याशिवाय लिहीत नाहीत … आणि एकदा बाण सुटल्यानानंतर माघार ही नसते वास्तव न्यूज़ ची.. तर या गहाळ झालेल्या फाईली कुठे गायब झाल्या याचा शोध सुरू आहे…. म्हणे.. अविरत कक्ष उघडत आहे त्यांनी त्या फायली शोधाव्यात.. .. शहरातील होर्डिंग आणि बॅनर मुक्ती ची घोषणा प्रशासक महोदयांनी रुजू होताना केली होती.. गेल्या तीन वर्षात मनपा च्या बॅनर च्या नियमावली नुसार २ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे राजकीय कुरघोडी आणि माझे बैनर काढताच कसे हात तर लावून दाखवा अश्या आलेल्या धमक्या काही मंडळीचे या व्यवसायात असलेले लागे बांधे यासाठी कारणीभूत आहे.. आता महापौर महोदयांनी १५ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक लावली आहे बॅनर आचारसंहिता लागू करण्यासाठी .. बघू या.. .. त्यांच्या प्रयत्नाना किती यश मिळते ते…. आज सुरू होणाऱ्या योजनाना आमच्या शुभेच्छा…जाता जाता… एक सूचना.. गौतम जैन आमचे एडमिन यांनी फूल बाजार जे पुलाखाली वसले आहे त्याचे काय झाले असे मार्केट बसवता येते का.. पूर्ण एक दिवस या ठिकाणी उपस्थित राहून तेथे काय चालते हे बघणे गरजेचे… मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची… जिथे कुंपण च शेत खाते.. तेथे कोण काय बोलणार.. मध्यंतरी उप महापौर दिपकसिंह रावत यांनी मात्र गुजरीजी विसावा उद्यान मधील कर्मचाऱ्याने केलेला क्यू आर कोड घोटाळा पुराव्यानीशी समोर आणला असे अनेक प्रकार आहेत .. कोनाळे कोचिंग क्लास चे अतिरिक्त बांधकाम अजून पाडले गेले नाही… खूप बाबी आहेत…. असो… आज सुरू होणारे उपक्रम अविरत आणि पारदर्शी पद्धतीने सुरू राहावेत ही सदिच्छा… नांदेडकर मंडळी ना गेल्या वर्षी अर्थ संकल्प सादर करताना झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशासक तथा आयुक्तांनी एक दिवस आड पाणी नांदेडकर मंडळी ना दिलेले आश्वासन.. मुद्दाम आठवण करून द्यायची म्हणून सांगितले… असो.. महापालिकेच्या नव्या उपक्रमांस शुभेच्छा आदरणीय महापौर कविता संतोष मुळे यांच्या प्रयत्नांना यश येवो… या शुभकामना.. काही सत्य आणि कटू लिहिले आहे .. कुणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व 🙏
विजय जोश, पत्रकार… अध्यक्ष, राज्य शासन अधिस्वीकृती समिती, लातूर विभाग, मा. कोषाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद, मुंबई


Post Views: 81






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks