प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत संसाधान व्यक्ती पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्ती यांची सेवा विविक्षित कामांसाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुकांनी अर्ज मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, आयजी कार्यालयाजवळ पद्मजासिटी रोड नवीन कौठा नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

संसाधान व्यक्ती या पदासाठी शैक्षणिक अर्हता सर्वप्रकारच्या पदवीधारकांना व ज्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे (डीपीआर) ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन वृद्धी, नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादांच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंर्भात तीन ते 5 वर्षाचा अनुभव किंवा बँकिंगक्षेत्रातील उमेदवारास प्राधान्य राहील. यासाठी एकुण 25 जागा भरण्यात येणार आहेत. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासुची तयार करण्यात येणार आहे.

संसाधन व्यक्तींना त्यांनी प्रत्येक लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळवून देण्याच्यादृष्टीने जे सहाय्य केले त्यानुसार मोबदला दिला जाईल. संसाधन व्यक्तीस मंजुरीनंतर प्रती बँक कर्जासाठी 20 हजार रुपये देण्यात येतील. त्यापैकी 50 टक्के रक्कम ही बँक कर्ज मंजुरीनंतर व उर्वरीत 50 टक्के रक्कम संबंधित उद्योगास उद्योग आधार, जीएसटी नोंदणी, आधार नोंदणी, एफएसएसएआयची उत्पादन मानके दर्जा पूर्तता, उद्योगाची कार्यवाही व लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर अदा केली जाईल. याव्यतिरिक्त मार्गदर्शक सुचना, सविस्तर पात्रता परिश्रमिक व इतर (मानधन) अटी व शर्ती या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात तसेच या योजनेच्या www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post Views: 106






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *