आंदोलनाच्या इशाऱ्यापूर्वी मनोज जरांगेंची कुणीतरी भेट घेतली:भाजप नेते प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट; पाटलांना भेटणारा व्यक्ती कोण?

0
db-temp-cover-marathi-2026-05-16t165405241_1778930746.jpg




मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली असली, तरी या घोषणेमागे मोठा राजकीय पूर्वग्रह आणि पडद्यामागच्या हालचाली असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. “जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी त्यांची कुणीतरी गुप्त भेट घेतली होती आणि त्यानंतरच हे उपोषण जाहीर झाले,” असा गौप्यस्फोट लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात जरांगेंना भेटणारी ती ‘अदृश्य शक्ती’ नेमकी कोण? यावरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक घेऊन उपोषणाची घोषणा केली. यावर तात्काळ प्रतिक्रिया देताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या आंदोलनाच्या टायमिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाड यांच्या मते, ही घोषणा उत्स्फूर्त नसून त्यामागे विशिष्ट राजकीय स्क्रिप्ट आहे. जरांगे पाटील यांना आंदोलनापूर्वी भेटलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा उद्देश सरकारला कोंडीत पकडण्याचा असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. केवळ देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचा डाव प्रसाद लाड यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार पाठराखण केली. ते म्हणाले, “राज्यात केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जाणीवपूर्वक रोष निर्माण केला जात असून, प्रत्येक वेळी त्यांचेच नाव पुढे केले जाते. मी या संदर्भात आंदोलक नेत्यांशी (काळकुटे यांच्याशी) बोललो आहे. त्यांच्या काय समस्या आहेत त्या त्यांनी सांगाव्यात, त्यावर कायद्याच्या चौकटीत तोडगा काढला जाईल.” प्रत्येक गोष्ट जरांगेंच्या मनासारखी होणार नाही आजवरच्या मराठा नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रसाद लाड म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत अनेक बलाढ्य मराठा नेते आणि मुख्यमंत्री झाले. मग त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? आताच प्रत्येक गोष्ट मनोज दादांच्या मनासारखी व्हावी, असा आग्रह का धरला जात आहे? सरकारला कोणत्याही गोष्टी नियमात बसूनच कराव्या लागतात.” मनोज जरांगेंचे ३० मे पासून आमरण उपोषण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी सरकारविरुद्ध पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असून, येत्या ३० मे पासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. आज आंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे ही वाचा… देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न:आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही- गणेश नाईक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला असतानाच, दुसरीकडे महायुतीचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी फडणवीसांची जोरदार पाठराखण केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वसमावेशक भूमिकेचे असतानाही केवळ ते ‘ब्राह्मण’ असल्यामुळेच त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed