न्यायाधीश काका, न्यायालयीन प्रक्रियेत निर्णय कसे दिले जातात?:एबीएम इंग्लीश स्कुलच्या चिमुकल्यांच्या प्रश्‍नांचे न्यायाधिशांनी केले समाधान




न्यायाधिश काका, न्यायलयीनप प्रक्रियेत निर्णय कसे दिले जातात, न्यायाधिश होण्यासाठी कोणत्या परिक्षा असतात, आरोपी, दोषारोप म्हणजे काय यासह इतर प्रश्‍नांवर न्यायाधिशांनी माहिती देऊन एबीएम इंग्लीश स्कुलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे समाधान केले. विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून यश मिळवावे असा सल्ला देखील देण्यात आला. येथील एबीएम इंग्लीश स्कुलच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व सत्र न्यायालयात क्षेत्रभेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी न्यायालय, त्यामधील प्रकिया, निर्णय देणे यासह इतर बाबींची माहिती घेतली. यावेळी विद्यार्थी समर्थ मुसळे याने न्यायालयीन प्रक्रिया कशी चालते असा प्रश्‍न विचारला. त्यावर न्यायाधीशांनी कायदेशीर बाबींच्या आधारावर केवळ न्याय्य निर्णय देतो. न्यायाधीश बनण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? असा प्रश्न वीरा भारुकाने विचारला. यात वकीलीचा अभ्यासक्रम केल्यानंतर न्यायाधीश होण्यासाठी स्वतंत्र परीक्षा होते, असे न्यायाधीशांनी सांगितले. तर नेतल अग्रवाल हिने एखाद्या केसचा निकाल लागायला किती वेळ लागतो? असे विचारले त्यावर केसचे महत्व, त्यातील साक्षी पुरावे यासह इतर महत्वाच्या बाबी यावर निकालाचा वेळ ठरतो, असे न्यायाधीशांनी सांगितले. तर ईश्वरी सूर्यवंशीने लिगल एड म्हणजे काय? याची विचारणा केली. त्यावर कोणी गरीब असेल तर त्याला निशुल्क वकील पुरवला जातो, मात्र तो त्यांच्या मनाप्रमाणे दिला जात नाही, असे स्पष्ट केले. केस ट्रायलमध्ये कशी जाते? अशी विचारणा केल्यावर पोलिसांकडून आलेले दोषारोप व त्यावर अभ्यास करून केस ट्रायलला जाते, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे न्यायाधिशांनी समाधान करून त्यांना संपूर्ण प्रक्रियात समजावून सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परिश्रम व जिद्दीने अभ्यास करून विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमवावा असा सल्ला दिला. या क्षेत्र भेटीसाठी संस्थेचे अध्यक्ष दिलीप बांगर, प्राचार्य जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक नितीन शिंदे, संदिप सर, पायल सोनी यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *