झेडपी शाळेची परसबाग ठरली कृषी प्रयोगशाळा‎:शेळकेवाडीच्या विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती, पोषण आहारात मिळणार ताज्या भाज्या‎

0
250_177833076869ff2c908485c_67641184012.jpg



जिल्हा परिषद शाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येणारे जुने चित्र आता वेगाने बदलू लागले आहे. सांगोला तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, शेळकेवाडी (शिवणे) येथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचा केवळ कायापालटच केला नाही, तर राबवलेला “परसबाग” उपक्रम वि

.

शाळेतील उपलब्ध जागेचा कल्पक वापर करून तयार केलेल्या या परसबागेला सुरक्षित कुंपण घालण्यात आले असून, त्यावर पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारी आकर्षक घोषवाक्ये लिहिली आहेत. या बागेत पालक, मेथी, टोमॅटो, वांगी, मिरची आणि कोथिंबीर यांसारख्या देशी वाणांच्या भाज्यांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे, आधुनिक शेतीचा परिचय म्हणून विद्यार्थी येथे मायक्रोग्रीन्स चीही यशस्वी लागवड करत आहेत.

पर्यावरण रक्षणासाठी येथे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला जातो. शेणखत आणि शाळेतील पालापाचोळ्यापासून तयार केलेले गांडूळ खत. पाण्याची बचत करण्यासाठी ‘रेन हार्वेस्टिंग’ आणि सांडपाण्याचा पुनर्वापर. ठिबक सिंचन आणि पारंपरिक पद्धतीचा मेळ करत आहेत. तसेच मुख्याध्यापक भागवत भाटेकर आणि सहशिक्षिका शितल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास वाघमोडे, उपाध्यक्ष समाधान भाटेकर आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून ही बाग फुलवली आहे. या उपक्रमाचे केंद्रप्रमुख वैजयंता जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर आणि गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी विशेष कौतुक केले आहे.

या परसबागेत विद्यार्थी स्वतः तण काढणे, पाणी देणे आणि कापणीची कामे करतात. बागेतील ताज्या भाज्यांचा वापर शालेय पोषण आहारात केला जातो, तर उर्वरित भाजीपाला विक्रीतून शाळेसाठी निधी उभारला जातो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कृषी ज्ञानासोबतच व्यावहारिक गणित कळते आणि व्यवहार ज्ञानाचे प्रत्यक्ष धडे मिळत आहेत. हे त्यांच्यासाठी भविष्यात उपयोगी पडणार आहे.

या शाळेने आधुनिक आणि सेंद्रिय शेतीचा मोठा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला आहे.पर्यावरण रक्षणासाठी येथे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला जातो. परसबागेमुळे मुले निसर्गाच्या जवळ गेली आहेत. तंबाखूमुक्त आणि प्लास्टिकमुक्त शाळेसोबतच सेंद्रिय शेतीचा हा संस्कार त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या परसबागेत पर्यावरण संवर्धनाची संदेश देणारी घोषवाक्ये लिहिली आहेत. — भागवत भाटेकर, मुख्याध्यापक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed