मेळघाटच्या विकासासाठी ‘मिशन 28’ ला गती:समन्वयातून परिणाम साध्य करण्याचा निर्धार,आरोग्य, पोषण सुधारण्यावर देणार भर‎

0
240_177833724369ff45db34a14_pmission28.jpg



मेळघाटच्या विकासासाठी विशेषत: आरोग्यविषयक परिस्थितीत बदल घडवण्यासाठी ‘मिशन २८’ ला अधिक गती देण्याचा निर्णय शनिवारी घेतला. सीईओ सत्यम गांधी यांनी तसे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सीईओ गांधी यांनी शनिवारी ९ मे रोजी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. य

.

गर्भवती महिलांच्या नोंदणीपासूनच त्यांचा पोषण आहार, रोजगार, आरोग्य सेवा आदीवर प्रभावी उपाययोजनाच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. यासाठी आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा विभागाने समन्वय राखून काम करावे, पूर्ण लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशही यावेळी दिले. ग्रामपंचायतींनी गावात कुठेही पाणी गळती होणार नाही, याची नियमित तपासणी करावी व परिसर स्वच्छता राखावी, असेही सांगितले. . उमेद व कृषी विभाग यांनी एकत्रित प्रयत्नातून अती जोखीम गटातील महिलांच्या घरी परसबाग तयार करावी. आरोग्य सेवक व परिचारिकांनी नियमित भेटी देऊन पाठपुरावा करावा, त्याचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र नोंदवावे, असे निर्देश दिले. मेळघाटातील बाल व मातामृत्यूदर कमी करणे ही प्राधान्याची बाब आहे. सर्व विभागांनी समन्वयातून काम करत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आरोग्य, पोषण व मूलभूत सेवा पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे; प्रभावी अंमलबजावणीने अपेक्षित बदल साध्य होईल, असेही सीईओ सत्यम गांधी यांनी या बैठकीत स्पष्ट केले. ग्रामपंचायतींनी गावात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व त्यानुसार नियोजन करावे. याशिवाय, व्हिसीडीसी व्यतिरिक्त गर्भवती मातांना अधिक पोषण आहार कसा उपलब्ध करून देता येईल आणि कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी कसा मिळवता येईल, याबाबतही बैठकीत विचारमंथन करण्यात आले.

सीएसआर संदर्भात केली चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed