मंगळवेढ्यातील सर्व संतांच्या स्मारकांचा प्रस्ताव सादर करा:खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचे आश्वासन
![]()
बसवेश्वर स्मारक मार्गी लागले असून मंगळवेढा ही संतांची नगरी म्हणून ओळख होण्यासाठी सर्व संतांच्या स्मारकांचा एकत्रित प्रस्ताव सादर करा, मी स्वतः त्याचा पाठपुरावा करते, असे अभिवचन सोलापूरच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिले. मंगळवेढा नगरपालिकेत भेट दिली असता नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, नगरसेविका सीमा बुरजे, नगरसेवक अनिल बोदाडे, प्रमोद सावंजी, नारायण गोवे, कवी इंद्रजीत घुले यांच्यासह नागरिक व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ६ नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचे प्रमाणक नमुना के ६४ वरती असलेले स्वाक्षरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांनी काढून घेतल्याची बाब नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. बैठकीत नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी नगरपालिकेच्या महत्त्वाच्या अडचणी खासदारांसमोर मांडल्या.नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा तसेच पाणीपुरवठा व वीजपुरवठा विभागासाठी इंजिनिअर देण्याची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तात्काळ बैठक लावून कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याविषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले. मंगळवेढा शहराचा हद्दवाढ प्रस्ताव शासन दरबारी दाखल आहे, तो मार्गी लावणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी सांगताच, हद्दवाढीसाठी आपण पूर्ण प्रयत्न करू, असे डॉ. वाघमारे यांनी आश्वासित केले. नगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा
