Cloth covering in the Bhagwant temple during the rain, white stripes on the floor, planning done in the temple area to reduce the intensity of the sun

0
app_177815077269fc6d7419424_1003563783.jpg



सध्या वैशाख वणव्याच्या झळांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा होरपळत असून, तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. अशा कडक उन्हात बार्शीतील आराध्य दैवत श्री भगवंत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नयेत, यासाठी भगवंत देवस्थान ट्रस्टने कंब

.

उन्हाळ्यामुळे मंदिरातील फरशी प्रचंड तापते, ज्यामुळे अनवाणी चालणाऱ्या भाविकांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात पांढऱ्या रंगाचे पट्टे ओढले आहेत. पांढऱ्या रंगामुळे फरशीचे तापमान कमी राहण्यास मदत होत असून, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

वैशाख शुद्ध द्वादशीला भगवंत प्रकट दिन साजरा झाला. त्या काळात भाविकांची मोठी गर्दी असते, म्हणून तात्पुरता डोम उभारला होता. मात्र, उन्हाचा तडाखा कायम असल्याने मंदिर प्रशासनाने केवळ उत्सवापुरती सोय न ठेवता, संपूर्ण उन्हाळाभर भाविकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाचे हे भक्तवत्सल नियोजन सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. बाहेर प्रचंड ऊन आहे, पण मंदिर परिसरात आल्यावर व्यवस्था पाहून खूप दिलासा मिळाला. विशेषतः फरशीवर पाय पोळत नाहीत, ही मोठी सोय झाली आहे. दरवर्षी प्रकट दिनानिमित्त मोठा मंडप उभारला जातो आणि उत्सव संपताच तो काढला जातो. पण यंदा ट्रस्टने असा निर्णय घेतला की, जोपर्यंत उन्हाची तीव्रता कमी होत नाही, तोपर्यंत भाविकांना सावलीतच दर्शन मिळाले पाहिजे. म्हणूनच तात्पुरता डोम काढल्यावर लगेचच कायमस्वरूपी कापडी आच्छादन उभारण्यात आले. ^भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यांचे दर्शन सुसह्य व्हावे, हाच आमचा उद्देश आहे. प्रदक्षिणा मार्गावर पांढरे पट्टे ओढून तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. – दिलीप बुडूख, सरपंच, श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी.

अशा आहेत सोयी-सुविधा . कापडी डोमचे सावट: प्रकट दिनानिमित्त उभारलेला डोम काढल्यानंतर, आता मंदिर परिसरात कायमस्वरूपी कापडी छत (आच्छादन) उभारण्यात आले आहे. . उत्तर बाजूची दर्शन रांग: मंदिराच्या उत्तर बाजूस दर्शन रांगेच्या ठिकाणी मोठे कापडी आच्छादन करण्यात आले आहे, ज्यामुळे सावलीत राहून दर्शन घेणे सुलभ झाले आहे. . भविष्यातील नियोजन: पूर्व दरवाज्यासमोरही लवकरच कापडी आच्छादन टाकून मंडप उभारला जाणार आहे.

दर्शन सुसह्य व्हावे, हाच उद्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed