पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) विधानभवनात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पदवीधरांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता रोजगार, कौशल्यविकास आणि शैक्षणिक संधींच्या माध्यमातून ठोस काम करण्याचा अजेंडा घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, आमदार सतेज (बंटी) पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष वसंत मोरे, के. जे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक कल्याण जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आघाडीच्या नेत्यांच्या हस्ते संकल्पनामा प्रकाशित करण्यात आला. “पदवी केवळ कागदी प्रमाणपत्रापुरती मर्यादित न राहता त्यातून रोजगार, कौशल्य आणि संधी निर्माण झाल्या पाहिजेत. ग्रामीण आणि शहरी भागातील पदवीधरांना समान संधी मिळणे हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू असेल,” असे देशमुख-जाधव यांनी सांगितले. त्यांच्या संकल्पनाम्यात जिल्हानिहाय रोजगार आराखडा, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती विश्लेषण व सायबर सुरक्षा यांचे मोफत प्रशिक्षण, डिजिटल ग्रंथालये आणि नवउद्योजकांना शासकीय योजनांशी जोडण्याचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निश्चित वेळापत्रक, उत्तरपत्रिका तपासणीत पारदर्शकता आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिक्षक भरती, वेतन, पदोन्नती, बदली व अनुदानाचे प्रश्न सोडविण्यासह ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती व डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. महिला उद्योजकता, क्रीडा आणि ‘ड्युअल करिअर मॉडेल’लाही प्राधान्य देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतील राजकीय वातावरण आता अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
हर्षदा देशमुख-जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला:महाविकास आघाडीच्या उमेदवार, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज भरला