![]()
खंडाळा गावचे पहिले सरपंच कै. एकनाथराव जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. अरुण जोशी यांच्या वतीने शाळेच्या नावे एफडी काढण्यात आली आहे. या एफडीवर मिळणाऱ्या व्याजातून गेल्या पाच वर्षांपासून दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आजीवन बक्षिसे दिली जातात. मार्च २०२५ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत खंडाळा केंद्रात श्रेया कमलेश पवार हिला प्रथम क्रमांक मिळाला. तिला ४०१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. प्राची नवनाथ वेळंजकर हिला द्वितीय क्रमांकासाठी ३०१ रुपये, तर ईश्वरी ज्ञानेश्वर बहाळस्कर हिला तृतीय क्रमांकासाठी १०१ रुपयांचे बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण सोहळ्यात प्रशालेचे मुख्याध्यापक अल्लाउद्दीन शेख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एस. एस. बागुल, उपाध्यक्ष शफिक शेख, मेजर मिलिंद बागुल, केंद्रप्रमुख बबनराव तगरे, मुख्याध्यापक मनोज गव्हाणे, मुख्याध्यापक सुनिल प्रधान आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुरेश बर्डे, ईश्वर खेडकर, कल्पना गवारे, मनीषा कुमावत, रेखा भालेकर, आसाराम जाधव, गोविंद त्रिभुवन, ज्ञानेश्वर बहाळस्कर, अशोक दारवंटे, विक्रम पठारे, भास्कर घायवट, जोशना बकाल आणि विद्यार्थी उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांपासून जोशी कुटुंबाकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची परंपरा आजही सुरू आहे. या उपक्रमाची परिसरात चर्चा आहे.
जोशी कुटुंबाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
