![]()
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून रंगसंवाद संस्थेच्या ‘हिबाकुशा’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. बहुजन हिताय बहुजन सुखाय या संस्थेच्या ‘झाले मोकळे आकाश’ या नाटकाने द्वितीय तर आकार सोशल फाउंडेशनच्या होत्या काही चिमण्या या नाटकाने
.
बालनाट्य स्पर्धेचा निकाल : दिग्दर्शन – प्रथम : मिहीका शेंडगे (हिबाकुशा), द्वितीय : संदीप उडाणशिव (झाले मोकळे आकाश), तृतीय : किरण लोंढे (बालन) प्रकाश योजना – प्रथम : प्रदीप राजपूत (होत्या काही चिमण्या), द्वितीय : शशिकांत (हिबाकुशा), तृतीय : उमेश बटाणे (झाले मोकळे आकाश) नेपथ्य – प्रथम : तारासिंग मरोड (होत्या काही चिमण्या), द्वितीय : मळसिद्ध देशमुख (हिबाकुशा), तृतीय : संदिप जाधव (झाले मोकळे आकाश) रंगभूषा – प्रथम : विजयालक्ष्मी श्रावण (होत्या काही चिमण्या), द्वितीय : शिवशंकर स्वामी (भेट), तृतीय : रमेश श्रावण (हिबाकुशा) वेशभूषा – प्रथम : अंजली मित्रगोत्री (हिबाकुशा), द्वितीय : कुणालसिंह चौहान (होत्या काही चिमण्या), तृतीय : पूजा चाकोते (ताटी उघडा) संगीत दिग्दर्शन – प्रथम : श्रीकृष्ण जोशी (हिबाकुशा), द्वितीय : रोहित लिगाडे (होत्या काही चिमण्या), तृतीय : विश्वजीत माने (ताटी उघडा) उत्कृष्ट अभिनय – रौप्य पदक : सम्राट जौंजट (झाले मोकळे आकाश) व आरोही शेळके (भेट) अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – आराध्या डोळसे (झाले मोकळे आकाश), श्रावणी लोखंडे (बालन), रुद्राक्षी इंगळे (म्याडम), वेदिका कांबळे (होत्या काही चिमण्या), अनन्या पिंपळेकर (हिबाकुशा), विरसिंह ठाकूर (सदाफुली रंगीत झाली), अलोक शेळके (भेट), ओंकार कांबळे (गोलूमोलू), अथर्व भोसले (वल्ली), हर्षवर्धन गोतसुर्वे (मुके शब्द). आदींनी कलाकारांनी बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. सोलापूर. राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून प्रथम आलेल्या हिबाकुशा या नाटकातील एक प्रसंग
एकूण ४३ बालनाट्यातून विजेते संघ अंतिम फेरीत
सोलापूर केंद्रासाठी शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण ४३ बालनाट्य सादर झाले. विविध संस्थानी यात सहभाग घेतला परीक्षक म्हणून हेमंत गव्हाणे, देवेंद्र भिडे, अमृता जोगदेव यांनी काम पाहिले.
