TCS प्रकरण MIM पक्षाशी जोडणे चुकीचे:मुस्लीम समाजातील सुशिक्षित मुलामुलींना त्रास देण्यासाठी हा कट – असदुद्दीन ओवैसी

0
db-temp-cover-marathi-2026-05-09t145116627_1778320348.jpg




नाशिकच्या कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर निर्माण झालेल्या वादावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणातील कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवले आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. TCS प्रकरणाला MIM पक्षाशी जोडणे चुकीचे आहे. मुस्लीम समाजातील सुशिक्षित मुलामुलींना त्रास देण्यासाठी हा सगळा कट असल्याचा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “निदा खान हिचा एचआर विभागाशी कोणताही संबंध नव्हता, असे टीसीएसच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. टीसीएस प्रकरणात ९ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एका एफआयआरमध्ये निदा खान हिच्यावर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करण्यात आला. एफआयआर होण्यापूर्वीच तिची दुसरीकडे बदली झाली होती. या प्रकरणातील तक्रारदार हा सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित आहे. सध्या या प्रकरणात कोणतेही निकाल देऊ शकत नाही.” बुरखा आणि पुस्तके बाळगणे गुन्हा नाही एफआयआरमध्ये निदा खानच्या घरातून बुरखा, नकाब आणि पैगंबर मोहम्मद यांचे पुस्तक जप्त केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर ओवेसी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “या सगळ्या वस्तू आक्षेपार्ह कधीपासून झाल्या,? कुणी आपल्या धर्माचे पुस्तक बाळगत असेल, तर ते बेकायदेशीर कसे ठरू शकते? केवळ द्वेषापोटी आणि सुशिक्षित मुस्लीम मुलामुलींना त्रास देण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात आहेत.” निदा खानची निर्दोष मुक्तता होईल “दिल्लीत यापूर्वी अशाच प्रकारे मिर्झा गालिब यांचे पुस्तक सापडल्यावरून मुस्लीम तरुणांना दहशतवादी ठरवण्यात आले होते, जे पुढे कोर्टाने फेटाळून लावले. निदा खान प्रकरणातही न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून तिची निर्दोष मुक्तता होईल,” असा विश्वास ओवेसी यांनी व्यक्त केला. आरोप सिद्ध होईपर्यंत दोषी ठरवणे चुकीचे या प्रकरणातील वृत्तांकनावर ओवेसी यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. “काही लोकांकडून या प्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू आहे. जर मीडियाच न्यायाधीशांचे काम करू लागला, तर ते लोकशाहीसाठी भयावह आहे. जोपर्यंत न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत कुणालाही दोषी ठरवणे चुकीचे आहे. या प्रकरणातील तक्रारदार हा सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित आहे, हे विसरून चालणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले. नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर भाष्य नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता ओवेसी म्हणाले, “तो मुलगा कोर्टात या प्रकरणाचा सामना करेल. त्याला जे काही बोलायचे आहे, ते तो न्यायालयासमोर मांडेल. यात परेशान होण्यासारखे काहीही नाही. कायदा आपले काम करेल.” हे ही वाचा… TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही:मतीन पटेलला वाचवण्यासाठी ओवेसींची धडपड; मंत्री शिरसाटांची CM फडणवीसांकडे SIT चौकशीची मागणी नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, सत्ताधारी आणि एमआयएम (MIM) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. “हे प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचा व्यापार असे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला वाचवण्यासाठी ओवैसींची धडपड असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed