दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील!; अजित पवार असतानाच प्रयत्न सुरू होते:आता शरद पवार निर्णय घेतील– नरहरी झिरवाळ




दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, अजित पवार असतानाच यासाठी प्रयत्न सुरू झाले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. त्यातूनच नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवण्याच्या निर्णयानुसार जागावाटप झाले होते, त्यामुळे पवार साहेब आमचा नक्की विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, कारण अजित पवार असतानाच त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. न.प. आणि जि.प, पंचायत समिती यामध्ये एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला त्या अनुषंगानेच जागावाटप झाले. त्यामुळे पवार साहेब आमचा विचार करतील. त्या दृष्टीने आम्ही साहेबांकडे जाण्यापेक्षा साहेब आम्हाला बोलू शकतात किंवा सांगू शकतात, कारण आम्ही आता पोरके झालो आहोत. शरद पवारांचे कायम मार्गदर्शन नरहरी झिरवाळ म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती गंभीर झाली किंवा दोन पक्ष वेगळे झाले तरी शरद पवार हे आतून मार्गदर्शन आणि सहकार्य करत होते. अजित पवार यांना शरद पवारांच्या नावाने एक आधार होता. शरद पवार पक्षाच्या भवितव्यासाठी निर्णय घेतील. पवार कुटुंबाने एकत्र राहणे गरजेचे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, सर्व नागरिकांची अशी मागणी आहे की वहिनींना मंत्रिमंडळात समाविष्ट केले पाहिजे. पवार कुटुंब एकत्र आले आहेच. पवार कुटुंबाने एकत्र राहणे गरजेचे आहे हे सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे. अनेक नेत्यांना अजित पवार गेल्याने खूप त्रास होत आहे. अजित पवारांच्या आठवणी कायम सोबत राहतील. अजित पवार यांच्यासारखा नेता होऊच शकत नाही. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ म्हणाले की, अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे.अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हे राष्ट्रवादी काँग्रेससमोरील मोठे आव्हान आहे. झिरवाळ यांच्या विधानामुळे हे आव्हान अधिक ठळकपणे समोर आले आहे. येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत बैठकांमध्ये आणि सत्ताधारी आघाडीत यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. ही वेळ यायला नको होती- खोसकर हिरामन खोसकर म्हणाले की, काही बोलण्यासारखे ठेवलेच नाही. पांडूरंगाने तेवढी वेळ टाळायला हवी होती. आम्ही सर्व सर्व जण पोरके झालो आहोत. आम्ही खूप मोठ्या संकटात पडलो आहोत. मी माझ्या आई-वडीलानंतर मी अजित पवारांना मानायचो. एकाच मंगळवारी मी मुंबईत गेलो नाही तर दादांना मला झापले म्हणे तू डॉक्टर होतास का? ही वेळ यायला नको होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *